Saturday, July 27, 2024

Latest Posts

THANE: पडघा स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

आधुनिकतेची कास धरत अनेक विषयांची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच जनसामान्यांना व्हावी, यासाठी आकर्षक प्रकल्प या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारले होते.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन नवनिर्मितीला चालना मिळावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन (SCIENCE EXHIBITION) भरविण्यास सुरुवात झाली असून भिवंडी (BHIWANDI) तालुक्यातील पडघा (PADGHA) येथील टी. ए. पाटील इंग्रजी शाळेत विज्ञान प्रदर्शन १६ डिसेंबर २०२३ रोजी मोठया उत्साहात पार पडले. शाळेअंतर्गत असलेल्या या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील तिसरी ते दहावीच्या एकूण ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात ४५ विज्ञान प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले होते.

पर्यावरणाची (ENVIRONMENT) जाणीव करून देणाऱ्या व विज्ञानाचा प्रसार व्हावा अशा विषयांवर आधारित प्रकल्पांचा देखावा या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेला पाहायला मिळाला . आधुनिकतेची कास धरत अनेक विषयांची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच जनसामान्यांना व्हावी, यासाठी आकर्षक प्रकल्प या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारले होते. त्यामुळे हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी तसेच पडघा परिसरातील नागरिकांनी या विज्ञान प्रदर्शनात (SCIENCE EXHIBITION) हजेरी लावली होती.

विज्ञान प्रकल्प (SCIENCE PROJECT) उभारलेल्या प्रकल्पाची प्रत्येक विद्यार्थी अचूक अशी माहिती देत असल्याने त्यांच्याकडे पालक वर्गाकडून तर कुतूहलाने बघण्यात येत होते. यामध्ये अवकाश विज्ञान (Space Science), जागतिक उष्मिकरण, पर्यावरण (ENVIRONMENT), पृथ्वीवर मानवाला जिवंत ठेवण्याचे प्रकल्प, पाण्याची बचत (WATER SAVING), विकसित शहर, वृक्षारोपण (Plantation), टाकाऊ पासून टिकाऊ (Durable from waste), विजेची बचत (LIGHT SAVING) अशा अनेक विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आले होते.

यावेळी पालकांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर शालेय विज्ञान प्रदर्शनात विज्ञान शिक्षक, तसेच सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यावेळी टी. ए. पाटील इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका शिक्षक, जिवन विद्या शिक्षक प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक यांचे विशेष सहकार्य लाभले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss