पवारसाहेब देतील तो उमेदवार ‘खासदार’ होणारच, काय आहे Kiran Mane यांची पोस्ट?

पवारसाहेब देतील तो उमेदवार ‘खासदार’ होणारच, काय आहे Kiran Mane यांची पोस्ट?

अभिनेते किरण माने यांनी पुन्हा एकदा एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. किरण माने यांनी माढ्यातला उमदेवाराबद्द्ल भाष्य केले आहे.

काय म्हणाले किरण माने? 

माढ्यातला उमेदवार जाहीर होण्याआधीच आठ हजार कार्यकर्त्यांच्या कालच्या मेळाव्यात फिक्स ठरलंय. ह्यावेळी फक्त आणि फक्त तुतारीच वाजली पायजे. इषय कट! मला संवाद साधायला बोलंवलंवतं खरं, पण ईडी बहाद्दूरांनी जनमानसात इतकी लाज घालवून घेतलीय की, भाषण करताना लै खोलात जाऊन सांगावंच लागत नाय. या कारस्थानी, भ्रष्टाचारी लोकांचा नांगा ठेचायचा हे पक्कं केलंय जनतेनं!

माणदेशी मातीतल्या माणसांची प्रेम करायची तर्‍हाच न्यारी

शेठचं नांव घेतलं की लोकं खालनं ओरडत्यात, “हाकला त्याला.” राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. अभयसिंह जगताप दोन महिने माझ्या मागं लागलेवते, ‘आमच्या कार्यकर्त्यांची खुप इच्छा आहे तुम्ही यावं म्हणून.’ मलाच शक्य होत नव्हतं. काल त्यांंनी मुंबईला गाडी पाठवून अक्षरश: मला उचलून नेलं. माणदेशी मातीतल्या माणसांची प्रेम करायची तर्‍हाच न्यारी. अभयदादांची पुरोगामी चळवळीशी असलेली नाळ. उच्चशिक्षीत असल्यामुळे व्यक्तिमत्त्वात असलेला ग्रेस. सगळंच लै भारी. खरंतर असा माणूस संसदेत पायजे. असो. राष्ट्रवादीची मुलूखमैदानी तोफ शशिकांत शिंदे. आएएस अधिकारी ते राजकीय नेता हा प्रवास केलेले बुद्धीमान नेते प्रभाकर देशमुखसाहेब सगळ्यांचीच उपस्थिती कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी होती. एकंदरीत काय… तर माढ्याला पवारसाहेब देतील तो उमेदवार ‘खासदार’ होणारच, ही माणदेशी काळ्या पत्थरावरची लकीर हाय असं समजा!

हे ही वाचा:

उन्हाळ्यात पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

शिवनेरीवर अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकमेकांसमोर, समोर येताच अमोल कोल्हे आढळरावांच्या पाया पडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version