Monday, May 20, 2024

Latest Posts

प्रभू श्रीरामांनी केलेला चमत्कार कोल्हापूरमध्ये आजही पाहायला मिळतो

आज संपूर्ण देशामध्ये जल्लोषात रामनवमी साजरी केली जात आहे. देशभरामध्ये जिथे हिथे प्रभू रामाचे वास्तव्य होते तिथे तिथे आज काही अवशेष सापडतात.

आज संपूर्ण देशामध्ये जल्लोषात रामनवमी साजरी केली जात आहे. देशभरामध्ये जिथे हिथे प्रभू रामाचे वास्तव्य होते तिथे तिथे आज काही अवशेष सापडतात. कोल्हापूरमध्ये ही असा एक डोंगर आहे जिथे श्री रामाचे, माता सीता आणि लक्ष्मणजींनी वास्तव्य केले होते तिथे श्री रामांनी घडवलेला एक चमत्कार आजारी पाहायला मिळतो. भगवान शंकराची महती असणारी देशभरात अनेक ठिकाणे आहेत. पण महाराष्ट्रामध्ये असे एक ठिकाण आहे जिथे प्रभू रामाचे आणि भगवान शंकर या दोघांचे अस्तित्व एका ठिकाणी आहे.

कोल्हापूरमध्ये हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले रामलिंग हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर श्री राम आणि भगवान शंकर महतीसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा प्रभू श्रीरामांनी १४ वर्षाचा वनवास भोगत होते तेव्हा येथे वास्तव्य केले होते अशी माहिती पुराणामध्ये मिळाली आहे, आळते गावाच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत, गर्द वनराईत वसलेले हे रामलिंग आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे.चारी बाजूने हिरवळ, कडक ऊन्हात ही अल्हाददायी, शांत असे वातावरण आहे. श्री रामलिंग मंदीर हे एका अखंड दगडात कोरलेले आहे आणि याठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजाअर्चा केली जाते, प्रभू रामचंद्र १४ वर्षाच्या वनवासात असताना या ठिकाणी त्यांचे वास्तव होते.

प्रभू रामचंद्र रामलिंग बेटावर वास्तव्यात होते. तेव्हा त्यांनी भगवान शंकराचे आराधना केली होती. त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले होते पण पाणी नसल्यामुळे ते शक्य झाले नाही. अशावेळी प्रभुरामांनी बाणातून डोंगराला छेद दिला त्यातून महादेवाच्या पिंडावर अखंड जलाभिषेक सुरू केला तो आजपर्यंत सुरू आहे हा चमत्कार भक्तांना आजही त्या मंदिरातील गुहेत गेल्यावर पाहायला मिळतो. वनवासात असताना रामचंद्र येथे आले होते. त्यांनी इथे शंकराची आराधना केल्याने अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशी आख्यायिका आणि त्यामुळे मंदिराच्या बाहेर गोमुखातून पाण्याची धार पडत असते. इतक्या मंदिरा बाहेरचा सभामंडप पुणे जिल्ह्यातल्या मावळ्या भागातल्या मंदिराच्या अनुभूतीत देतो सभामंडपात विठोबा रखुमाईची मूर्ती आहे येथे गेली. शंभर वर्षाहून अधिक वर्ष अखंडपणे सुरू असलेले ध्वनी म्हणजेच अग्निकुंड आहे आणि मुख्य स्थान गुहेत आहे. गुहेत शिवलिंग आणि गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत गुहेत सर्वत्र पाणी जिरपते.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss