Tuesday, May 21, 2024

Latest Posts

पुलवामाच्या हल्ल्याला जबाबदार कोण? Uddhav Thackeray यांचा PM Modi यांना सवाल

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीं 'सामना' या वृत्तपत्राला विशेष मुलखात दिली. या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. "पुलवामाचा जो हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण?"असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) धुरळा देशभर उडत असून देशभरात मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. अजूनही मतदानाचे चार टप्पे बाकी असून सर्वच राजकीय पक्ष जोर लावत आहेत. आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीं ‘सामना’ या वृत्तपत्राला विशेष मुलखात दिली. या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “पुलवामाचा जो हल्ला झाला, त्याला जबाबदार कोण?”असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. शिवसेना उबाठा नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हि विशेष मुलाखत घेतली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पुलवामात जे घडलं त्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी विस्तवासारखं वास्तव जगासमोर मांडलं. त्याला कुणी उत्तर देऊ शकलेलं नाही. घटनात्मक पदावर बसलेल्या माणसाने जेव्हा हे भीषण वास्तव जगासमोर मांडलं. त्याच्यावर आज कुणी चर्चा करत नाहीये. काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण? पुलवामाच्या हल्ल्याला जबाबदार कोण? जर काश्मीर अजूनही अशांत असेल तर यांना कशासाठी परत मतं द्यायची? एका बाजूने लेह-लडाखमध्ये, अरुणाचलमध्ये चीन अतिक्रमण करतोय. रस्ते बांधतोय. आपल्या गावांची नावं बदलतोय तरीसुद्धा सरकारला काही वाटत नाही. “

काश्मिरी पंडितांबाबत भाष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले, “बाळासाहेबांनी कधी हा विचार नाही केला कि, काश्मीरमधील पंडितांचा आणि माझा संबंध काय? अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदुहृदयसम्राटच होते. तेव्हा काश्मिरी पंडितांना शिवसेनाप्रमुखांनी आश्रय दिला. त्यावेळी मोदी हे नाव कुठेच नव्हतं. आता तर तुम्ही पंतप्रधान झालात. तरी काश्मीरमधील पंडित घरी जाऊ शकत नाही. काश्मीरमधील हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत. मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाहीत. जणू काही सगळे प्रश्न संपले आहेत आणि उद्धव ठाकरे हा एकच प्रश्न देशासमोर आहे. मोदी आणि शहा महाराष्ट्रात येत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंना संपवून काश्मीर शांत होणार आहे का ? उद्धव ठाकरेंना संपवल्यावर चीन परत जाणार आहे का? उद्धव ठाकरेंना संपवल्यावर मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत परत मिळणार आहे का? याच्याबद्दल मोदींकडे काय उत्तर आहेत?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे ही वाचा:

‘मोदी सरकारची हि कौरवनिती आहे’, Uddhav Thackeray यांची Pm Modi यांवर टीका

लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय, Uddhav Thackeray यांची विरोधकांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss