Monday, May 20, 2024

Latest Posts

ऐन निवडणुकीत पावसाची हजेरी; “या” भागांत ऑरेंज अलर्ट

१६ मे रोजी पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर,धाराशिव  कोल्हापूर सह अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळायला सुरुवात झाली आहे. ९ मे पासून राज्यात विजांच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. काल (९ मे) रोजी विदर्भाला पावसाने झोडपले होते तर आज (१० मे) रोजी मराठवाड्यासह पुण्याला पावसाने झोडपून काढल्याने १३ मे पर्यंत राज्यात ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात अवकाळी जोरदार, तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस बरसणार आहे.

नागपूरात पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून गारपिटीमुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. एकाबाजूला उष्णतेच्या लाटेत वाढ होत असताना दुसरीकडे ढगाळ वातावरण दिसून येत आहे. १६ मे रोजी पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर,धाराशिव  कोल्हापूर सह अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुढील पाच दिवसात कोल्हापूर, सांगली, सोलापूर,धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. मात्र आज सकाळपासून पुण्यातील कात्रज, स्वारगेट येथे पाऊस सुरु आहे. सातारा जिल्ह्यात १२ मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने दिले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच ऐन निवडणुकीत नेत्यांच्या प्रचारादरम्यान पावसाने देखील उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे रद्द झाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रपवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा पुणे दौरा रद्द झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा देखील रद्द झाला आहे.दरम्यान आज होणारा राज ठाकरे यांचा पुणे दौरा रद्द होण्याची साशकता आहे.

हे ही वाचा:

लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत… PM Modi यांच्या ऑफरवर Sharad Pawar यांचे प्रत्युत्तर

Congress मध्ये जाण्यापेक्षा आमच्यासोबत या, PM Modi यांची Sharad Pawar, Uddhav Thackeray यांना मोठी ऑफर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss