Monday, May 20, 2024

Latest Posts

‘EVM Machine तर आपल्या बापाची आहे’, BJP नेत्याच्या मुलाचा प्रताप

बुधवारी दिनांक ८ मे रोजी भाजपच्या एका नेत्याच्या मुलाला आणि एका पोलिंग एजन्टला अटक करण्यात आली. त्यांनी मतदान केंद्रातून केलेल्या लाईव्ह स्ट्रीम व्हिडीओच्या चर्चेनंतर हि कारवाई करण्यात आली. हा व्हिडीओ गुजरातमधील दाहोड येथील मतदान केंद्रावरील होता.

बुधवारी दिनांक ८ मे रोजी भाजपच्या एका नेत्याच्या मुलाला आणि एका पोलिंग एजन्टला अटक करण्यात आली. त्यांनी मतदान केंद्रातून केलेल्या लाईव्ह स्ट्रीम व्हिडीओच्या चर्चेनंतर ही कारवाई करण्यात आली. हा व्हिडीओ गुजरातमधील दाहोड येथील मतदान केंद्रावरील होता. गुजरातमध्ये ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले होते. याच दिवशी भाजपच्या नेत्याच्या मुलाने मतदान केंद्रावर ताबा मिळवत हे लाईव्ह स्ट्रीम प्रदर्शित केले.

भाजपचे नेते रमेश भाभोर यांचा मुलगा विजय भाभोर याने हा प्रताप केला असून, त्याच्या इंस्टाग्राम हॅन्डल वरून मतदानाचे लाईव्ह दृश्य प्रसारित केले. जे सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. प्रसारित केलेल्या या व्हिडीओमध्ये भाभोर याने मतदान करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला दिसून येत आहे. या लाईव्हमध्ये तो ‘EVM मशीन अपने बाप नु छे’ असं म्हणताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये मतदान केंद्रावरील स्टाफ शांतता राखण्यास सांगत असून तरीही पोलिंग एजन्ट आणि भाजप नेता देखील त्याला बढावा देताना दिसून येत आहे. यानंतर पोलिसांनी विजय भाभोर याला ताब्यात घेतलेला व्हिडीओ दिसून आला.

भाजप नेता स्वतःला या प्रकरणापासून बाजूला करत असताना काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार प्रभा तावीयाद यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवत योग्य ती ऍक्शन घेण्याची मागणी केली. याचबरोबर तावीयाद यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी केली. माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसच्या गुजरात प्रवक्ता मनीष दोषी याने भाजपवर ‘भाजप लोकांचे मतदानाचा हक्क हिसकावून घेत आहे’ असा आरोप केला. ते असेही म्हणाले की, अलीकडे अश्या खूप तक्रारी आल्या आहेत की, वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापासून प्रलंबित केलं जात आहे. व्हिडीओ वर बोलताना एका झालेल्या प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्याने निश्चित दिली असून भाजपच्या या नेत्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत, उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

उन्हाळ्यात लूक क्लासी ठेवायचा तर कोणत्या कपडे आणि  रंग तुमच्या वॉर्डरोबमध्ये असावेत जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss