Thursday, February 29, 2024

Latest Posts

मराठा आंदोलनाची २४ डिसेंबरपासून दिशा काय असणार? मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितंल…

राज्यभरात मराठा आरक्षण हा मुद्दा आणखीनच चिघळत चालला आहे.

राज्यभरात मराठा आरक्षण हा मुद्दा आणखीनच चिघळत चालला आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ आंतरवली सराटी गावात गेले आहे. सरकारकडून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली. २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमचा पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे आता जरांगे राज्य सरकारला वेळ वाढवून देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईलच, नाही दिले तरी आम्ही लढायला सज्ज आहोत. परंतु त्यांना जो २४ डिसेंबपर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे. त्यातला एक घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे. वेळ नाही नाही मी कालच सांगितलं आणि हे मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं असून मी आडून मी चर्चा करत नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या लेकरांच्या हिताचा आज निर्णय होणार आहे. आमच्या नोंदी असताना आम्हाला का आरक्षण देत नाही, सरकार का वेठीस धरत आहे. आज ३ वाजेपर्यंत निर्णय होणार आहे, नोंदीच्या आधारे निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या नोंदी मिळल्या आहेत आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते असे जरांगे म्हणाले आहेत.

मी त्यांना सांगितलं, जे उपोषण सोडताना आले होते. त्यावेळी जे कागदावरती लिहिलं होतं, ते फक्त तुम्ही एकदा वाचा. तुम्ही ते वाचलं की तुम्हाला वेळ मागायची गरजच पडणार नाही. कारण तुमच्या हातात आणखीन आठ- दहा दिवस आहेत. त्यामुले तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही. आता हा शेवटचा लढा आहे त्यामुळं लढूनच आरक्षण मिळवायचं आहे. दमायचा नाही पर्फेक्ट नियोजन काय जे करायचंय ते नियोजनबद्ध निर्णायक ठोस ठरवून चांगली बांधणी करणार असल्याचं जरागेंनी सांगितलं. मराठा संघटना आणि जरांगे यांच्यात १२ ते ३ अशा तीन तास बैठक चालणार आहे यामध्ये काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

हे ही वाचा:

नागपूर-अमरावती रोडजवळील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू

अभिनेत्री रुबीना दिलैकच्या घरी आल्या लक्ष्मी,दिला दोन जुळ्या मुलींना जन्म

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss