Sunday, May 19, 2024

Latest Posts

कोणत्या बाजार समितीत कोणी मारली बाजी? या दिग्गज नेत्यांच्या हाथी आलं अपयश

APMC Election Result : आज राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निकाल जाहीर झाला आहे. ही निवडणूक चूर्सिंची झालेली पाहायला मिळाली. निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांच्या हाती यश आलं आहे तर बऱ्याच जणांना अपयशाचा सामना करावा लागला आहे.

APMC Election Result : आज राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निकाल जाहीर झाला आहे. ही निवडणूक चूर्सिंची झालेली पाहायला मिळाली. निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांच्या हाती यश आलं आहे तर बऱ्याच जणांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीच्या धक्का बसलेल्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. , शिवसेनेचे नेते संजय राठोड, संजय गायकवाड, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले, निलय नाईक, राजा मुंडे, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, आमदार रवी राणा आणि काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना सोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सगळ्या दिग्गज मंडळींना धक्का बसला आहे. तर या विरुद्ध काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, धीरज देशमुख, संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे आणि भाजपच्या समाधान आवताडे यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे.

दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिग्रस बाजार समितीत महाविकास आघाडीला भरभरून यश मिळालं आहे. या निकालात महाविकास आघाडीला १८ पैकी १४ जागा मिळाल्या असून ४ चं ठिकाणी संजय राठोड गटाचे संचालक आले निवडून आलेत. त्यामुळे संजय राठोड यांच्या पॅनलचा हा मोठा पराभव मानला जातोय. बुलढाणा बाजार समितीती महाविकास आघाडीने १८ जागांपैकी १२ जागा जिकूंन घवघवीत यश संपादन केलं आहे. या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप युतीला फक्त ६ जागांवर यश मिळवता आले आहे.

नगरच्या राहुरी बाजार समितीत खा.सुजय विखे पाटील यांच्या पदरी अपयश आले असून आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. तनपुरे गटाने १८ पैकी १६ जागा जिंकत विजय मिळवला आहे. त्यांनी विखे आणि कर्डिले गटाचा पराभव केला आहे.

हे ही वाचा : 

भाजपला सुचले तीन वर्षांनंतर शहाणपण, राऊतांची बोलंदाजी निष्प्रभ करण्यासाठी ‘राणेस्र’

बारसू रिफायनरी प्रकल्पाला अजित पवार यांची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss