Saturday, May 18, 2024

Latest Posts

Aai Kuthe Kay Karte, अखेर अरुंधती – आशुतोष अडकणार लग्नबंधनात, नववधू लूक पाहिलात का?

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सर्वच कलाकारांना (artists) प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत आणि या मालिकेला सुंदर वळण आले आहे या मालिकेमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर अरुंधती आणि आशुतोष हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

स्टार प्रवाहवरची (Star Pravah) मालिका आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आणि या मालिकेला रंजक वळण आले आहे.
या मालिकेत अरुंधती (Arundhati) आणि आशुतोष (Ashutosh) ने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.
जेव्हा अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देशमुख कुटुबांमध्ये अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यश आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधती – आशुतोष च्या नात्यात सुख आले आहे.
अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्नासाठी सुंदर आऊटफिट (outfit) घातले आहेत. अरुंधतीने सुंदर लाल रंगाची साडी घातली आहे आणि आशुतोषने सोनेरी रंगाचा कुर्ता आणि धोतर घातले आहे.
आई कुठे काय करते या मालिकेमधील देखमुख परिवाराच्या घरी अरुंधतीची हळद, मेहंदी आणि लग्न सोहळा पार पडणार आहे. कारण अरुंधतीच्या मुलीला जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरात होणार असे ठामपणे सांगितले.
आशुतोष अरुंधती यांच्या लग्नासाठी देशमुख कुटूंबाची धावपळ सुरु झाली आहे. आशुतोष आणि अरुंधतीच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

हे ही वाचा :

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss