Aditi Rao Hydari चा Cannes Film Festival मधला लूक पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने नुकत्याच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. कान्स फिल्म फेस्टिवल हा १६ मे रोजी सुरु होऊन २७ मे रोजी संपन्न झाला. यामध्ये अनेक भारतीय कलाकारांनी हजेरी लावली होती.

Aditi Rao Hydari चा Cannes Film Festival मधला लूक पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने नुकत्याच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. कान्स फिल्म फेस्टिवल हा १६ मे रोजी सुरु होऊन २७ मे रोजी संपन्न झाला. यामध्ये अनेक भारतीय कलाकारांनी हजेरी लावली होती. या फिल्म फेस्टिवलला अदिती राव हैदरी हिने सुद्धा आपली उपस्थति दर्शवली. सध्या अदितीने कान्स फिल्म फेस्टिवलसाठी परिधान केलेल्या आऊटफिट्स (Outfits) चे फोटोज त्याचबरोबर कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवरचे फोटोज आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अदिती राव हैदरीने आपली पहिली झलक कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर गुरुवारी दाखविली. तिने आपल्या इन्स्टा हॅण्डल वरून कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवरचे फोटोज शेअर केले.
अदितीने कान्स फिल्म फेस्टिवलच्या दिवशी पिवळ्या रंगाचा स्ट्रॅपलेस गाउन परिधान केला होता. त्या गाउनवर फुलांचे छानसे डिटेलिंग केले होते. अदितीच्या गाउनला भरपूर फ्रिलस होते. अदितीने या गाउनच्या खाली त्याच रंगाचे हिल्स घातले होते.
अदितीचा ड्रेस मायकेल सिन्कोने डिझाइन केला होता. अदितीने तिच्या गाउनवर अगदी कमी ऍक्सेसरीज घातल्या असून तिचा लूक हा अगदी मनमोहक दिसून येत होता.
सेलिब्रिटी स्टायलिस्ट समन रतनसीने अदितीचा सुंदर लूक केला होता. अदितीचा कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवरील लूक पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.
अदितीने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये लॉरीअल या ब्युटी ब्रँडचे प्रतिनिधित्व केले. अदिती कॅथरीन ब्रेलाट यांनी दिग्दर्शित केलेल्या L’Ete Dernier (लास्ट समर) च्या स्क्रीनिंगला उपस्थित होती.

हे ही वाचा:

Yashasvi Jaiswal ला IPLमधल्या कामगिरीमुळे मिळणार टीम इंडियामध्ये स्थान

दहावीचा निकाला होणार जाहीर …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version