Saturday, July 27, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राबवली मुंबईमध्ये स्वच्छता मोहिम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत स्वच्छता मोहिम राबवली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत स्वच्छता मोहिम राबवली आहे. मुंबईतील जुहू चौपाटी येथे त्यांनी स्वच्छता केली. त्यानंतर त्यांनी जुहू स्थित इस्काॅन मंदिराला भेट दिली. आणि राधा कृष्णाचे दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने त्यांचे स्वागत केले. आज महापालिकेच्या पाच विभागागातील पाच वॉर्डांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: रस्त्यावर पाणी मारुन रस्ते स्वच्छ केले. मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करत असताना, मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाईप हातात घेऊन, रस्त्यांवर पाणी मारले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू इस्कॉन मंदिरात राधे कृष्णाचे दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रंथ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
आज स्वच्छता मोहीमेमध्ये आपल्याला ही सहभागी करून घेणार आहोत, स्वच्छता मोहीम ही चळवळ म्हणून मी व्यक्तीशा लक्ष देतोय असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईचा सफाईचा हिरो हा सफाई कर्मचारी आहे. मी आव्हान केल्यानंतर एकदाच लवकर येऊन ते काम करतात. आम्ही कोणाच्या टिकांकडे लक्ष देत नाही. आम्ही आमचे काम करत राहतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्लम परिसरातसुद्धा आम्ही स्वच्छता राबवत आहोत. धारावीमध्ये सार्वजनीक स्वच्छतागृहे आणि इतर परिसर आम्ही स्वच्छ केला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
इस्कॉन स्वतः चांगला उपक्रम राबवते असे एकनाथ शिंदे म्हणाले. अन्नदान, परियावरण, तरुण मार्गदर्शन सह पालिकेच्यासोबत मिळून रुग्णालय व शाळेत अन्नदान करण्याचे मोठे काम मंदिर प्रशासन करते असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss