Tuesday, May 21, 2024

Latest Posts

लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्रपणे लढवून विजयी होण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बावनकुळे कुटूंबियांनी आदरपूर्वक स्वागत करून हनुमानाची मूर्ती भेट दिली. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, महायुतीचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे, आमदार आशिष देशमुख, शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव आणि बावनकुळे कुटूंबीय उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss