Saturday, May 18, 2024

Latest Posts

दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस ब्लॅक वेल्वेट गाऊनमध्ये लुक व्हायरल

दीपिका पदुकोण एक भारतीय उत्कृष्ट अभिनेत्री. दीपिका पदुकोण भारतामधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे. तिचे कौतिक केले तेवढे कमीच तिच्या कौतूकामधे तिला तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. ती भारतामधील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या सूचीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे. दीपिका पदुकोण हि बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. दीपिकाने सुद्धा तिच्या करियर ची सुरवात बॅडमिंटनने केली होती. तिने राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपमध्ये बॅडमिंटन खेळले परंतु फॅशन मॉडेल बनण्यासाठी तिने खेळातील करिअर सोडले.


दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही तिच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसत असते आणि ती नेहमीच तिचे फॅशनचे लुक (fashion look) सोशल मीडियावर शेयर करत असते.
दीपिका पदुकोण ही 95व्या ऑस्कर (95th Oscars) पुरस्कारांच्या प्रतिष्ठित मंचावर ग्लॅमरस ब्लॅक वेल्वेट गाऊनमध्ये तिच्या नवीन टॅटूची चमक दाखवली आहे.

दीपिकाचा हा आऊटफिट पाहून तिचे सर्व चाहते घायाळ झाले. ९५व्या ऑस्करसाठी मखमली हातमोजे आणि स्टेटमेंट डायमंड नेकलेससह जोडलेला एक जबरदस्त काळा मखमली गाऊन परिधान करून, दीपिकाने जागतिक व्यासपीठावर अभिजातता दाखवली.
दीपिकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेयर केले आहेत त्यावर तिच्या चाहत्यांनी अनेक टिपण्या देऊन त्यांचे मन ओतले आहे.
दीपिका पदुकोण हि तिच्या चाहत्यांच्या मने नेहमीच घायाळ करत असते आणि ती लवकरच एका वेब सिरीज मध्ये दिसणार आहे अशा चर्चा रंगल्या आहेत.
दीपिका ही एक उत्तम अभिनेत्री तर आहेच आणि तिला तिच्या भूमिकांसाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.

हे ही वाचा :

PM Narendra Modi : जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

Maharashtra Unseasonal Rain: राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाचा इशारा, पिकांना फटका बसण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss