spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

शुभमंगल सावधान २०२३ मध्ये ‘या’ मराठी कलाकारांनी बांधली लग्नगाठ  

शुभमंगल सावधान २०२३ मध्ये ‘या’ मराठी कलाकारांनी बांधली लग्नगाठ  

सध्या मराठी सिनेविश्वात लग्नाचा माहोल सुरु आहे.२०२३ हे सरत वर्ष खरतर मराठी कलाकारांसाठी खास ठरलं आहे.अनेक मराठी कलाकारांनी यंदाच्या वर्षात आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नगाठ बांधली आहे.आपल्या आयुष्यभराचा साथीदार या कलारांनी निवडला आहे.चला तर मग जाणुन घेऊयात यंदाच्या वर्षी कोणकोणते कलाकार बोहल्यावर चढले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधून आपल्या विनोदांनी, भूमिकांनी महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री वनिता खरात हिने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबतत ३ फेब्रुवारी २०२३ रोजी वनिता लग्नगाठ बांधली.
लग्नाची बेडी मालिकेतील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम हे २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकले. संकेतने त्याची गर्लफ्रेंड सुपर्णा श्याम सोबत सोबत लग्न केलंय. या दोघांचं लग्न पुण्यात मोठ्या थाटात पार पडणार आहे.
बिग बॉसच्या घरात प्रेमात पडलेल्या अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा 18 नोव्हेंबर 2023 रोजी मोठ्या दिमाकात विवाहसोहळा पार पडला. हे लग्न निसर्गाच्या सानिध्यात व्हावी, अशी अमृता आणि प्रसादची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी एक सुंदर ओपन रिसॉर्ट बुक केलं होतं. अमृता आणि प्रसादच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओंवर त्यांचे चाहते तसंच मित्र मैत्रिणींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
सारेगमप लिटिल चॅमप्स’ फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नसोहळा पार पडला आहे. मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्याला त्यांच्या मित्रमैत्रीणींनी आणि कुटुंबानी हजेरी लावली होती. सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वात मुग्धा आणि प्रथमेश सहभागी झाले होते.या कार्यक्रमादरम्यान मैत्री झाली आणि कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी यांचा 25 डिसेंबर रोजी थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. स्वानंदी आणि आशिषच्या लग्नसोहळ्यात सिनेसृष्टीतल्या त्यांच्या मित्र मैत्रीणींनी देखील हजेरी लावली होती.या दोघांच्या ही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Latest Posts

Don't Miss