Saturday, July 27, 2024

Latest Posts

हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पाच गोष्टींचा समावेश

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हवामानातील बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी लागते.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हवामानातील बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात मधुमेहाचा त्रास वाढू शकतो. तसेच या रुग्णांना आहाराची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी ‘विटामिन डी’ असलेले अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.हिवाळा हा ऋतू आल्हादायक असला तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्रासदायक आहे. तुम्हला जर रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल तर तुम्ही हे पाच पदार्थ खाऊ शकता.

पालक आणि मुळा पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला फायबर आणि आवश्यक असलेली पोषक तत्व मिळतात. या भाज्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
स्ट्रॉबेरी आणि इतर काही बेरीची फळे खाल्याने अँटिऑक्सिडंट्स आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतात. त्याच्यामुळे शरीराची साखर गरज नियंत्रित करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
कोबी, ब्रोकोली, आणि हिरव्या भाज्यांमध्ये काब्सचे प्रमाण कमी असते तर फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि साखरेची पातळी नियंत्रित राहते.
गाजर, मुळा, बीट किंवा रताळे यांसारख्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे हिवाळ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
बदाम अक्रोड, चिया सीड काजूबिया यासारख्या सुख्यमेव्याने मधुमेह नियंत्रित होते. हेल्दी फॅट, प्रोटीन युक्त असलेल्या या गोष्टी रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.

Latest Posts

Don't Miss