Saturday, May 18, 2024

Latest Posts

Holi 2023, तुमच्या मुलांच्या सुरक्षतेसाठी काही होळीच्या टिप्स

होळीचा सण (Holi festival) म्हंटलं की सर्वानाच उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे रंगपंचमीची (Rangpanchami). रंगपंचमीला लहानापासून ते मोठ्यांपर्यत सर्वच रंगांसोबत खेळत असतात. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे कि बाजारामध्ये अनेक रासायनिक रंग (chemical dyes) सुद्धा असतात त्यामुळे ते रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक (Harmful) ठरू शकतात. त्यामुळे बाजारामध्ये अनेक हार्बर रंग (Harbar Color) सुद्धा उपलब्ध असतात ते तुमच्या शरीराचे संरक्षण सुद्धा करू शकतात.

यावर्षीची होळी ही ७ मार्च आणि ८ मार्च आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वानाच होळी साजरी करण्याची उत्सुकता असते. परंतु लहान मुले होळीची सर्वात जास्त वाट पाहत असतात कारण त्यांना पिचकारी आणि रंग घेऊन मित्रांसोबत रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडायचे असते.
काही शाळेतील मुले एक- दोन दिवसाआधीच रंगपंचमीची तयारी सुरु करतात पिचकारीने खेळायला लागतात. अश्या वेळी परिस्थितीमध्ये पालकांनी सण सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
रंगपंचमीसाठी गुलाल किंवा तीव्र रंग सर्रास पाहायला मिळतात. त्यामध्ये अनेक रंग रासायनिक सुद्द्धा आहेत, त्यामुळे त्वचा आणि डोळ्यांना हानी होऊ शकते. रासायनिक रंगांऐवजी हर्बल रंगानी होळी खेळावी.
लहान मुलांच्या डोळ्यांना रंगांपासून संरक्षण करण्यासाठी ते रंगीबेरंगी गॉगल घालू शकतात. जेव्हा ते होळी खेळतात तेव्हा त्यांची त्वचा जास्तीत जास्त झाकण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत.
अनेक रंगांमध्ये रसायने असतात परंतु बाजारामध्ये तुम्ही सेंद्रिय रंग सुद्धा खरेदी करू शकता. अनेक रांगांमध्ये रसायन असल्यामुळे ते तोंडात गेल्यामुळे ते धोकादायक सुद्धा ठरू शकतात.
लहान मुले रंग आणि पाण्याने होळी खेळतात आणि तासनतास ओल्या कपड्यामध्ये असतात परंतु होळीचा हा सण हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान मार्चच्या हंगामात येतो त्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशामुळे काहीवेळा थोडीशी उष्णतेसह सौम्य थंडी जाणवते.अशा प्रकारचे हवामान मुलांसाठी हानिकारक असू शकते

हे ही वाचा :

Sandeep Deshpande घेणार आज पत्रकार परिषद, हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग तर २ जण ताब्यात

मराठवाड्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss