Saturday, April 27, 2024

Latest Posts

निरोगी शरीरासाठी आहारात करा ‘या’ फळाचा समावेश

किवी (Kiwi) हे फळ लांबट गोलाकार असते.

किवी (Kiwi) हे फळ लांबट गोलाकार असते. समशीतोष्ण हवामानात किवीची वाढ होते. भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्कीम, उत्तर प्रदेश, मेघालय या राज्यांत व निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात किवीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. किवीचे झाड द्राक्षाच्या वेलीसारख एक वेल असते. ज्या भागात किवीची लागवड असेल तेथे माश्या किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माश्या सोडल्या जातात.यामध्ये क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम भरपूर प्रमाणात आढळून येते.

निरोगी जीवशैली जगण्यासाठी रोज संतुलित आहार आणि व्यायाम करणे गरजेचे असते. जर तुम्ही हे योग्य प्रकारे या दोन्ही गोष्टींची सांगड घातली तर तुम्ही निरोगी जीवशैली जगू शकता.
किवी हे एका कॅल्शियम युक्त समृद्ध फळ आहे. एक कप किवीमध्ये ६१. २ मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे किवीचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
किवीमध्ये कॅल्शिअम सोबतच इतर पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. किवीमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात आपल्या सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
थंडीच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे, आपण सर्दी-खोकल्यासारख्या आजारांना लगेच बळी पडतो. जर तुम्हाला या आजारांपासून दूर राहायचे असेल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तुम्ही आहारात किवीचा समावेश करू शकता.
किवीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमसोबतच फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. या फायबर्समुळे शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होते. किवीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेहींसाठी देखील हे फळ फायदेशीर आहे.

Latest Posts

Don't Miss