Saturday, May 18, 2024

Latest Posts

Jacqueline चा हॉट आणि ग्लॉसी लुक

श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसने (Jacqueline Fernandez) बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्यामध्ये तिने अनेक भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत. विनोदी चित्रपट, ग्लॅमरस भूमिका, ऍक्शन मूवी या चित्रपटांमध्ये तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (actress) नामांकनासाठी आयफा पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.

जॅकलिन फर्नांडिस ही एक श्रीलंकन ​​(SriLanka) अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जॅकलिनने रिऍलिटी शो (reality show) आणि गाण्यांच्या व्हिडीओजमध्ये दिसण्याच्या व्यतिरिक्त तिने भारतीय चित्रपटांमध्ये प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
जॅकलिन फर्नांडिसने २००९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. जॅकलिन फर्नांडिसचा जन्म १ ऑगस्ट १९८५ ला बहरीनमध्ये श्रीलंका , कॅनेडियन (Canadian) आणि मलेशियन (Malaysian) वंशाच्या बहुजातीय युरेशियन कुटुंबात झाला
जॅकलिनने तिच्या सोशल मीडियावर (Social media) तिचे काही फोटोस शेयर केले आहेत. त्यामध्ये तिने सोनेरी रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. त्या ड्रेसवर आकर्षक कोरीव काम केलेले आहे.
जॅकलिनने हा लुक झी सिने अवॉर्ड्ससाठी (Zee Cine Awards) केला आहे असे तिने तिच्या कॅपशन (Caption) मध्ये लिहिले आहे. त्या कॅपशन मध्ये तिने लिहिले आहे कि “टीम अटॅक फॉर ऍक्शन”
जॅकलिन फर्नांडिस ने तिच्या करिअरची सुरवात श्रीलंकेमध्ये टेलिव्हिजन रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर ती मॉडेलिंगमध्ये सामील झाली. तिने २००६ मिस युनिव्हर्स (Miss Universe) श्रीलंका हा किताब पटकावला.
भारतामध्ये तिने अलादिन या हिंदी चित्रपटमध्ये पदार्पण केले हा चित्रपट तिने २००९ मध्ये केला होता. त्यानंतर दुसरा चित्रपट २०११ मध्ये तिने मर्डर 2 या चित्रपटामध्ये यशस्वी भूमिका साकारली होती आणि या चित्रपटामध्ये तिला यश मिळाले. जॅकलिन बॉलीवूड मध्ये ग्लॅमरसाठी विशेषतः ओळखले जाते.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss