Friday, April 19, 2024

Latest Posts

गोल्डन शिमरी अनारकली ड्रेसमध्ये करिना कपूर पोहचली दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा नुकताच  मुंबईत पार पडला.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा नुकताच  मुंबईत पार पडला. अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर नेहमीच आपल्या लूक आणि फॅशनने सर्वांना घायाळ करत असते.या सोहळ्यात देखील करिनाचा लूक हटके होता.

 

मात्र करिना या सोहळ्यात एका गोष्टीमुळे चांगलीच चर्चेत आली.करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करीना ही शाहिदला इग्नोर करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद हा चित्रपट निर्माते राज आणि डीके यांच्यासोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसत आहेत. तिघांच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. त्यानंतर करीना रेड कार्पेटवर होते. करीना ही राज आणि डिके यांना हॅलो करते पण ती शाहिदसोबत काहीच बोलत नाही.
वयाच्या ४० व्या वर्षानंतर देखील करिना कपूप आजही तितकीच सुंदर आणि आकर्षक दिसते. करिनाने या पुरस्कार सोहळ्यासाठी गोल्डन शिमरी अनारकली ड्रेस परिधान केला होता. यावेळी करिनाचे मनमोहक सौंदर्य या सोहळ्याला चार चांद लावत होते असं म्हणायला हरकत नाही, यावर अत्यंत बारीक कलाकुसरीचे वर्क करण्यात आले होते. करिनाने हा ड्रेस अत्यंत स्टायलिश आणि रॉयल पद्धतीने कॅरी केला होता.
हा अनारकली संपूर्ण लाँग असून वरून मात्र डीपनेक आणि हाफशोल्डर ठेवण्यात आला आहे. तर यासह असणारा दुपट्टा करिनाने दोन्ही हातावर घेत स्टायलिश लुक केला होता. करिनाने तिचा हा लुक अत्यंत रॉयल पद्धतीने कॅरी केला होता.
करिनाने डोळ्यांवर ब्राऊन स्मोकी मेकअप करत डोळ्यात काळेभोर असे काजळ भरले होते. स्मोकी डोळे अप्रतिम दिसत होतो.या गोल्डन पीच कॉम्बिनेशन ड्रेससह तिने न्यूड मेकअप केलाय. अत्यंत हलक्या मेकअपमध्ये तिचं सौंदर्य फुलून आलं होतं.
करिनाचा हा संपुर्ण लूक अगदीच मनमोहक दिसत होता.तिच्या या लूकला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी चांगलीचं पसंती दर्शवली आहे.करिनाने या सुंदर लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Latest Posts

Don't Miss