Monday, May 20, 2024

Latest Posts

का साजरी केली जाते राम नवमी जाणून घ्या

महाराष्ट्रातील वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील नवमी हा दिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील नवमी हा दिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस अर्थात रामनवमी २९ मार्च २०२३ रोजी रात्री ९ वाजून ०७ मिनिटांनी सुरु होईल आणि शनिवार ३० मार्च २०२३ रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी संपेल.
या वर्षीचा सर्वसामान्य नागरिक रॅम नवमी हा दिवस शनिवार ३० मार्च २०२३ रोजी साजरा करतील. रामजन्माचा हा दिवस दीप प्रज्वलन करून आणि आतषबाजी करून साजर केला जातो. अनेक मंदिरांमध्ये राम नवमीच्या दिवशी रोषणाई केली जाणार आहे.
प्रभू रामाने रावणावर विजय मिळवला वाईटावर चांगल्याचा विजय झाला आहे. यांची आठवण म्हणून रामनवमी साजरी केली जाते या दिवशी प्रभू रामाचे भक्त मनापासून पूजा करतात आणि नंतर मनातील सदिच्छा रामासमोर व्यक्त केली जाते.
भगवान विष्णू पृथ्वीचे रक्षण करतात. त्यांनी रामाच्या रुपात पृथ्वीच्या रक्षणासाठी राक्षसांचा नाश केला. विष्णू देवाने अयोध्येत दशरथ राजाच्या घरात जन्म घेतला असे सांगतात. हा विष्णू देवाचा सातवा अवतार आहे असे सांगतात. मर्यादा पुरुषोत्तम रामाकडून संयम, चतुराई, सत्यवचन अर्थात खरे बोलणे, एक पत्नीव्रता हे गुण घेण्यासारखे आहेत.
प्रभू श्री रामाचा जन्म अयोध्येतील सूर्यवंशी क्षत्रिय वंशात त्रेतायुगातील चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला पुनर्वसु नक्षत्राच्या कर्क राशीला झाला. धर्मग्रंथानुसार राजा दशरथाला तीन बायका होत्या आणि तिघांनाही मूल नव्हते.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss