Tuesday, April 16, 2024

Latest Posts

माधुरी दिक्षीतचा इंडो-वेस्टन साडीतला ग्लॅमरस अंदाज

माधुरीने तिच्या अभिनयाच्या शैलीतून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.अभिनयासहित माधुरीने नृत्यात देखील आपलं कौशल्य दाखवलं आहे.

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत हिने नेहमीच प्रेक्षकांना तिच्या अदानी कायमच घायाळ केलं आहे.माधुरीने तिच्या अभिनयाच्या शैलीतून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.अभिनयासहित माधुरीने नृत्यात देखील आपलं कौशल्य दाखवलं आहे.

माधुरी दिक्षीत ही नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि फॅशनमुळे चर्चेत येत असते.तिचा हटके अंदाज प्रेक्षकांना कायम भूरळ घालतो.
माधुरी सोशल मीडियावर देखील काम सक्रिय असते.ती तिचे फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
माधुरीचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या घरात आहेत.तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.वयाच्या ५६व्या वर्षी देखील माधुरी अतिशय ग्लॅमरस दिसते.
तर नुकतच माधुरीने सोशल मीडियावर तिचे निळ्या रंगाच्या साडीचे फोटो शेअर केले आहेत.त्या फोटोंमध्ये माधुरच सौंदर्य अधिकाअधिक खुलून दिसत आहे.

 

माधुरीचा या इंडो-वेस्टन साडीतला नवा लूक सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.या साडीवर तिने मोकळे केस आणि हलका मेकअप करत तिने तिचा लूक पुर्ण केला आहे.

 

माधुरी आज जरी बॉलीवूडपासून दुर असली,तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Latest Posts

Don't Miss