spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

माझा प्रवेश म्हणजे PM MODI यांच्या विकसित भारत संकल्पाला माझे समर्थन – ASHOK CHAVAN

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. 
माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्यासह राज्यातून आलेले भाजपाचे प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
१२ फेब्रुवारी २०२४ रोजी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून काढता पाय घेतला.
भाजपातील माझा प्रवेश म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पाला माझे मनःपूर्वक समर्थन आहे असे अशोक चव्हाण भाजप पक्षप्रवेशानंतर म्हणाले.

Latest Posts

Don't Miss