Saturday, May 18, 2024

Latest Posts

ODI World Cup 2023 : टीम इंडियाच्या वनडे वर्ल्डकप संघातून ‘हे’ खेळाडू बाद…

वनडे वर्ल्डकप २०२३ ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी- ICC) द्वारे आयोजित केली जाणारी आणि पुरुष राष्ट्रीय संघांद्वारे स्पर्धा केली जाणारी एक चतुष्कोणीय क्रिकेट स्पर्धा आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी- ICC) द्वारे आयोजित केली जाणारी आणि पुरुष राष्ट्रीय संघांद्वारे स्पर्धा केली जाणारी एक चतुष्कोणीय क्रिकेट स्पर्धा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये भारत (India) या स्पर्धेचे यजमानपद (Hosts) भूषवणार आहे आणि ही स्पर्धा पूर्णपणे भारतात होण्याची ही पहिलीच वेळ असेल. कोविड-१९ (COVID-19) महामारीमुळे ही स्पर्धा मूळ वेळापत्रकापेक्षा लांबणीवर पडली होती. २०११ मध्ये ही स्पर्धा जिंकणारा भारत शेवटचा यजमान आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) हा पाच विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ आहे. या वर्षी भारतीय संघामधील कोणते खेळाडू वनडे वर्ल्डकपचा भाग होणार नाही आहेत, ते जाणून घेऊया.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. या संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. पण टीम इंडियात सात खेळाडूंचा समावेश नसेल हे मात्र निश्चित आहे.
२०१९ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळलेल्या ७ खेळाडूंना यावेळी स्थान मिळणार नाही. त्यापैकी एका खेळाडूने निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. तर ६ खेळाडू शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni)- २०१९ मध्ये टीम इंडियासाठी यष्टीरक्षक फलंदाज (Wicket-keeper batsman) म्हणून दिसलेल्या धोनीने आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी तो एकदिवसीय विश्वचषक संघात नसेल.
शिखर धवन (Shikhar Dhawan)- गेल्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियासाठी दोन सामने खेळणाऱ्या धवनने एकूण १२५ धावा केल्या. मात्र दुखापतीमुळे त्याला उर्वरित सामन्यांतून बाहेर बसावे लागले. यावेळी ३७ वर्षीय धवनचा विचार केला जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे.
विजय शंकर (Vijay Shankar)- २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक संघासाठी आश्चर्यकारक निवड झालेल्या विजय शंकरने ३ डावात केवळ ५८ धावा केल्या. विजय शंकरचं सध्या कुठेच नाव चर्चेत नाही. टीम इंडियाचे दरवाजे आधीच बंद झाले आहेत.
केदार जाधव (Kedar Jadhav)- एकदिवसीय विश्वचषक २०१९ साठी आणखी एक आश्चर्यकारक निवड म्हणजे केदार जाधव. पाच सामन्यात खेळलेल्या जाधवने फक्त ८० धावा केल्या होत्या. विश्वचषकानंतर जाधवला टीम इंडियात स्थान मिळालं नाही.
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)- गेल्या एकदिवसीय विश्वचषकात ६ सामने खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने १० विकेट घेतल्या होत्या. सध्या त्याचा नावाचा विचार नाही. त्यामुळे भुवनेश्वरला २०२३ वनडे विश्वचषक संघात संधी मिळणार नाही, असंच म्हणावं लागेल.
ऋषभ पंत (Rishabh Pant)- २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ४ सामन्यात फलंदाजी करणाऱ्या पंतने एकूण ११६ धावा केल्या होत्या. २०२२ मध्ये रस्ता अपघातात जखमी झालेल्या पंतला यावेळेस वनडे विश्वचषक संघात स्थान मिळणं कठीण आहे. कारण दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)- २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन सामन्यात खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने फक्त १४ धावा केल्या. यानंतर दिनेश कार्तिकला टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळाले. मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यामुळे यावेळी दिनेश कार्तिकला टीम इंडियात संधी मिळणं कठीण आहे.

हे ही वाचा:

संदीप क्षीरसागर यांनी सांगितली शरद पवारांसंदर्भात त्यांची भूमिका

भरत गोगावलेनी केला गौप्यस्फोट , राजकीय नेत्यांकडून नवीन चर्चांना उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss