व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर हार्दिक आणि नताशाचा पुन्हा एकदा पार पाडला लग्न सोहळा

व्हॅलेंटाईन दिनानिमित्त हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा लग्न सोहळा पार पाडून लग्नाचे क्षण रिक्रिएट केले.विशेष म्हणजे हे दोघेही पुन्हा विवाह बंधनात अडकले आहेत. तसेच व्हॅलेंटाईन डे च्या खास मुहूर्तावर त्यांनी हा सुंदर क्षण सजवला आहे.

व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर हार्दिक आणि नताशाचा पुन्हा एकदा पार पाडला लग्न सोहळा
व्हॅलेंटाईन दिनानिमित्त हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा लग्न सोहळा पार पाडून लग्नाचे क्षण रिक्रिएट केले आहेत.
हार्दिक पांड्या याने बायको नताशा स्टॅनकोविकसोबत उदयपूर येथे लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सद्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
हार्दिक पांड्याने या लग्न सोहळ्यात काळ्या रंगाचा कोट घातला आहे या लुक मध्ये तो जेंटलमेंट दिसत आहे.
नताशा ने लग्नात पांढऱ्या रंगाचा लांब लचक गाऊन, गळ्यात मोत्याचा हार आणि सिम्पल बन हेअर स्टाईल केली आहे. या साधारण स्टाईल मध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
विवाह सोहळ्या दरम्यान त्यांनी मुलासोबत फोटो काढला आहे, या तिघांना हि चाहत्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
हार्दिक पांड्याने लग्न सोहळ्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेयर करून म्हणतो कि तीन वर्षापूर्वी कमिटमेंट घेतली होती. आज ‘व्हॅलेंटाईन डे’ला याची पूर्तता झाली. या सेलिब्रेशनमध्ये मित्र आणि कुटुंबीय सोबत असल्याने आनंद आणखी वाढला.

 

हे ही वाचा :

सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर, शिंदे गटाचे वकील करणार युक्तिवाद

पुण्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेदरम्यान इंटरनेट सेवा असणार बंद, कॉपी करणाऱ्यांना सक्तीचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version