Saturday, May 18, 2024

Latest Posts

पुण्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेदरम्यान इंटरनेट सेवा असणार बंद, कॉपी करणाऱ्यांना सक्तीचे आदेश

मागील २ वर्ष जगभरात कोरोनाचे (covid) सावट पसरले होते. या कालावधीत बरेच निर्बंध घालण्यात आले होते. क्वारंटाईन, संचार बंदी तसेच दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र आता निर्बंध पूर्णपणे काढण्यात आले आहेत. यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने मुलांच्या परीक्षा होणार आहेत.

मागील २ वर्ष जगभरात कोरोनाचे (covid) सावट पसरले होते. या कालावधीत बरेच निर्बंध घालण्यात आले होते. क्वारंटाईन, संचार बंदी तसेच दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र आता निर्बंध पूर्णपणे काढण्यात आले आहेत. यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने मुलांच्या परीक्षा होणार आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांवर वाईट परिणाम झाला होता. मुलांची अभ्यास करण्याची गती कमी झाली आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान आता कॉपी बहाद्दरावर करडी नजर असणार आहे. परीक्षेच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन होऊ नये तसेच मुलांच्या भविष्याचा विचार करून हे नियम लागू करण्यात आले आहेत.

दहावी (SSC exam) आणि बारावीच्या (HSC exam) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी (Pune District Collector) कडक नियमावली जाहीर केली आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी परीक्षेदरम्यान पुणे जिल्ह्यातील परीक्षाकेंद्रावरील (examination centre) इंटरनेटची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक परीक्षा आणि माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर सुव्यवस्थेचा व कायद्याचा प्रश्न निर्माण न होता , परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी ही कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावली नुसार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते २५ मार्च, सायंकाळी ८ वाजेपर्यंत कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे आणि २ मार्च ते २५ मार्च या कालावधी दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे. हि परीक्षा सुरळीतपणे पारपडावी यासाठी या नियमावलीचे आयोजन केले आहे.

परीक्षे दरम्यान परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षा केंद्रावर येताना जवळ बाळगण्यास आणि परीक्षा केंद्राच्या आसपासच्या परिसराच्या १०० मीटर परिसरात वापरण्यास मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हे ही वाचा : 

Dharmendra साकारणार सुफी संतांची भूमिका, सोशल मीडियावर भूमिकेची चर्चा

Prateik Babbar पुन्हा पडलाय प्रेमात! शेअर केला खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss