Sunday, May 19, 2024

Latest Posts

पूजा सावंतला मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार

अभिनेत्री पूजा सावंतने अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

अभिनेत्री पूजा सावंतने अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर १. ७ मिलियन फॉलोवर्स आहेत. क्षणभर विश्रांती चित्रपटातून पूजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या अभिनयामुळे ग्लॅमरस स्टाईलने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
पूजा ही एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. प्रेक्षक तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पूजाने क्षणभर विश्रांती या मराठी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने पोस्टर बॉय, सतरंगी रे,गोंदण, आता गं बया,नीळकंठ मास्तर, साटं लोटं पण सगळं खोटं, दगडी चाळ, दगडी चाळ २ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अखेर पूजा सावंतला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली. पूजाने तिच्या जोडीदारासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. त्याला काही खास रोमँटिक कॅप्शनही दिले आहे.
समुद्रकिनाऱ्याजवळील फोटोना तिने खास कॅप्शन दिले आहे. आयुष्याच्या नव्या अध्यायाची एका खास व्यक्तीसोबत सुरुवात करत आहे, असे कॅप्शन दिले आहे. प्रेमाची जादू कमाल आहे, नव्या प्रवासाची सुरुवात, हे फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले आहे.

Latest Posts

Don't Miss