Thursday, May 9, 2024

Latest Posts

Time Maharashtra आयोजित stawberry with cm कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाचगणी येथे संपन्न

'स्ट्रॉबेरी विथ सीएम' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

Time Maharashtra आयोजित stawberry with cm कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाचगणी येथे संपन्न झाला.

‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

स्थानिक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे आपला कल वळवावा. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देणार आहे आणि त्याचा लाभ उचलण्यासाठी बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर, इथेनॉल निर्मिती करता येते.असे आवाहनही यावेळी त्यांनी  केले.
स्ट्रॉबेरी पासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, हे देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन पॅराग्लायडिंग हा एक साहसी खेळ असून तो खेळणे साहसी लोकांचे काम आहे. वर गेलेल्या माणसाच्या क्षमतेची कसोटी लागते. या खेळात सहभागी होण्यासाठी आलेल्या १२ देशांतील खेळाडूंचे स्वागत केले. तसेच लवकरच या खेळाचा वर्ल्ड कप देखील महाराष्ट्रात खेळावला जावा यासाठी प्रयत्न करू अशी खात्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Stawberry with cm या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मजेशीर उत्तरं दिली.

सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्थानिक स्ट्रॉबेरी उत्पादकांशी संवाद साधला.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॅराग्लायडिंग प्रि-वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना बक्षिस वितरण करत सन्मानित केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचवेळी विद्यार्थ्यांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

 

Latest Posts

Don't Miss