Saturday, May 18, 2024

Latest Posts

Teddy Day 2023, तुम्हाला मिळालेल्या टेडी बिअरच्या रंगाचे प्रेमशी काय आहे नातं ?

नुकतीच फेब्रुवारीला सुरुवात झाली आहे. सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. तुम्हाला माहित असेलच की या विकमध्ये विविध दिवस साजरे करुन सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जातो. या दिवसांमध्ये तुमच नात अधिक घट्ट होत. तसाच या विक मधील सरप्राइझिंग दिवस म्हणजे टेडी डे. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला सुंदर असा टेडी बिअर देऊन आपल्या मनातली गोष्ट सांगून त्याला खुश करून हा दिवस साजरा केला जातो. याची खासियत अशी आहे की तुमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणुन हा टेडी दिला जातो. टेडी बिअर देत असताना त्या प्रत्येक टेडीच्या रंगामागेही काही भावना लपलेल्या असतात, या भावना प्रेमासंदर्भात असतात पण या रंगाचे प्रेमाशी महत्व काय हे आपण जाणून घेऊयात.

जेव्हा तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला निळ्या रंगाचा टेडी बिअर देते तेव्हा समजून जा की त्याचे तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. कारण निळा रंग हा निसर्गातील आकाशाचा रंग आहे आणि आकाश हे अनंत असते.
जेव्हा तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला निळ्या रंगाचा टेडी बिअर देते तेव्हा समजून जा की त्याचे तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. कारण निळा रंग हा निसर्गातील आकाशाचा रंग आहे आणि आकाश हे अनंत असते.
गुलाबी रंग हा आवड दर्शवतो जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीने गुलाबी टेडी बिअर दिला तर, ती तुम्हाला मनापासून पसंत करते असा अर्थ होतो.
पिवळा रंग हा दिसायला सुंदर असतो. पण या रंगाचा टेडी बिअर तुम्हाला दिला तर त्या व्यक्तीला तुमच्यापासून वेगळे व्हायचे आहे असा संदेश दिला जात.
जर तुम्हाला कोणी नारंगी रंगाचा टेडी बिअर दिला तर, त्याचे तुमच्यावर प्रेम आहे पण ते त्याला व्यक्त करता येत नाही असा अर्थ होतो.
चॉकलेटी रंगाचा टेडी हा सर्वांनाच खूप आवडतो पण तुम्हाला कोणी हा भेट म्हणून दिला तर ती व्यक्ती तुमच्यावर नाराज आहे, तीची तुम्ही समजूत काढावी ही अपेक्षा असते.
जेव्हा तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला हिरव्या रंगाचा टेडी देते तेव्हा समोरील व्यक्ती तुमच्या प्रेमाचे उत्तराची प्रतीक्षा करत आहे असा संदेश ती देऊ इच्छित असते

जर टेडी डे दिवशी तुम्हाला काळया रंगाचा टेडी मिळाला तर तुम्ही केलेल्या प्रेम प्रस्तावास त्याने नकार दिला आहे असा अर्थ होतो.

Latest Posts

Don't Miss