Saturday, May 18, 2024

Latest Posts

१६ अपात्र आमदारांच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला वेग

विधानसभेचे अध्यक्ष राहून नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. आता या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहून नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. आता या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधिमंडळाने लगेचच शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली आहे. त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनासाठी मोठा निर्णय येऊ शकतो अशी माहिती विधिमंडमधील काही सूत्रांनी दिली आहे. असे सांगण्यात आले आहे की गरज पडल्यास लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे.

सुनावणीसाठी बोलाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास दोन्ही नेत्यांनी उलट तपासणीही करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालांनंतर आमदारांचा निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे. दोन्ही गटांना पुरावेही सादर करावे लागणार आहे. खरी शिवसेना नक्की कोणाची आहे या बाबतीत अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी लवकरच क्रांतिकारी निर्णय देणार आहे असे विधान काही दिवसापूर्वीच राहुल नार्वेकरांनी केले आहे. परंतु मी आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार आहे असे विधान राहुल नार्वेकरांनी केले आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर काय निर्णय देणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल नार्वेकरांच्या या विधानावर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चाना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या या प्रकरणामध्ये सुनावणीच्या दरम्यान अध्यक्षांकडे निर्णय देताना कालमर्यादा असावी की नाही यावरही युक्तीवाद झाला होता. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनीही हवे तर अध्यक्षांना २-३ महिन्यांमध्ये निर्णय घायला सांगावा असे सांगण्यात आले होते.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss