Friday, May 17, 2024

Latest Posts

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर केली टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ ते १९ जानेवारी दरम्यान, दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ ते १९ जानेवारी दरम्यान, दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत आणि १० सदस्यीय शिष्टमंडळ यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यावरून आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. दावोसमध्ये होणाऱ्या बैठकीची माहिती देताना अधिकारी म्हणाले, मागील बैठकीत स्वाक्षरी केलेल्या १. ३७ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांपैकी ७६ % अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. तसेच यंदाच्या वर्षात होणाऱ्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी आणि हरदीप सिंग पुरी हे देखील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

असंवैधानिक मुख्यमंत्री दावोसला जवळजवळ ५० लोकांना घेऊन जाणार आहेत. यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो,परंतु त्यांच्यापैकी काही जणांसाठी त्यांच्या मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे त्यांना सोबत घेऊन जात आहेत , असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंनी एक्सवर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील काही बेकायदेशीर सरकारमधील काही मंत्री दावोसला जाणार आहेत. असंवैधानिक मुख्यमंत्री दावोसला जवळजवळ ५० घेऊन जाणार आहेत. या ५० लोकांमध्ये अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांचा समावेश आहे. कुटुंबातील व्यक्ती घेऊन जाता हे समजू शकतो,परंतु त्यांच्यापैकी काही जण त्यांच्या मुलांना सुट्टी असल्याप्रमाणे सोबत घेऊन जात आहे, ही संख्या जवळपास ७० लोकांपर्यंत पोहोचली आहे. केवळ १० जणांनी शिष्टमंडळ म्हणून MEA ची आवश्यक राजकीय मंजुरी मागण्यात आली आहे, बाकीच्यांना नेण्यासाठी MEA च्या मंजुरीचा अर्ज न करता वैयक्तिक सहलीसाठी सोबत नेण्यात आले आहे. ७५ लोकांच्या सुट्टीमध्ये खासदार, माजी खासदार, खासगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची संपूर्णटीम, मुख्यमंत्री यांचे ओएसडी या सगळ्यांचा समावेश आहे. येथे 50 लोक काय करतील? तिथं फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील, सामंजस्य करारावर फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत. इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला? , असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

हे ही वाचा:

रामायण मालिकेतील राम पोहचले अयोध्येत,विमानतळावर लोकांनी आशीर्वाद घेत केलं स्वागत

तरुण वयातच केस पांढरे होण्यामागे आहेत ‘ही’ कारणे, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss