Saturday, July 27, 2024

Latest Posts

राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांना मिळाल्यानंतर मनसेने काढला चिमटा, पक्ष उभा करायला राज ठाकरे…

अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. या निकालानंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. अश्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजित पवार यांना डिवचले आहे.

NCP Crisis Latest Update : काल दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ही घडली आहे. केंद्रीय निवडणूक योगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने सुनावणी चालली. अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. या निकालानंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. अश्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजित पवार यांना डिवचले आहे.

या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ट्विट केले आहे. सध्या समाज माध्यमांवर हे ट्विट चर्चेत आले आहे. मनसेच्या अधिकृत पेजवरुन राज ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रत्नागिरीतील सभेत राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला केला होता. तोच व्हिडिओ या घडामोडीनंतर शेअर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मनसेने अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर कॅप्टशन मध्ये म्हणाले आहेत की, बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ ! #VisionaryRajThackeray 🧡 असं ट्विट करत मनसेने अजित पवार यांना मनसेने डिवचले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह (Symbol) आणि पक्ष (Party) अजित पवारांकडे (Ajit Pawar) सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा (New Party Name) विचार सुरू आहे. नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरु आहे. तर चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरु आहे. काही वेळात या संदर्भात निर्णय समोर येईल.

Latest Posts

Don't Miss