Saturday, May 18, 2024

Latest Posts

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला

शिवसेनेमध्ये जेव्हा पासून दोन गट झाले आहेत, तेव्हापासून मोठा संघर्ष दिसून येत आहे. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा ताफा अडवण्यात आला आहे. तीस वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम व शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा जोरदार घोषणा दिल्या. म्हणून अब्दुल सतार यांना गाडी मार्गस्थ व्हावं लागलं.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी शहरात शिंदे गटाच्या शाखा स्थापन कृषी विद्यापीठामध्ये मागासवर्गीय शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप केले. त्यानंतर मंत्री सत्तार हे पूर्णा येथे होऊ घातलेल्या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी पूर्णाकडे मार्गस्थ झाले. कार्यकर्ते मेळाव्याला जात असलेल्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना शिवसैनिकांनी रस्त्यातच अडवले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम आणि शिवसैनिकांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या समोरच पन्नास खोके एकदम ओके अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर शिवसैनिकांनी सत्तार यांना एक निवेदन देखील सादर केले.

घोषणाबाजीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांना काय करावे हे समजले नाही. आता यावर कोणती प्रतिक्रिया द्यावी यासंदर्भातही त्यांचा गोंधळ उडाला. त्यानंतर लगेच त्यांनी गाडीचा दरवाजा उघडवा आणि त्यांनी गाडीमध्ये प्रवेश केला. पूर्णाजवळ शिवसैनिकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवल्याने मोठा गोंधळ उडाला होता. पूर्णा येथील कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार हे परभणी येथील कार्यकर्ता मेळाव्याला हाजरी लावणार आहेत. मात्र, या ठिकाणच्या कार्यक्रमात देखील अशाच प्रकारे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा:

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवर CM शिंदेंचं ट्वीट; तर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Follow Us

चारचाकी गाडीचे प्रशिक्षण घेत असलेल्या महिलेनं, ब्रेकऐवजी क्लच दाबल्याने डिलेव्हरी बॉयचा मृत्यू

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss