Saturday, May 18, 2024

Latest Posts

जे नाही सांगितलं तीच गोष्ट AJit Pawar यांनी केली मेळाव्यात

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी या होत आहेत. दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड ही घडली आणि त्यामुळे राज्यातील वातावरण हे पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून काढता पाय घेत बंड केला. आणि आता पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर आज दिनांक ५ जुलै रोजी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील त्यांच्या गटाची बैठक ही आयोजित केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांचे आज मुंबईत मेळावे सुरु आहेत. अजित पवार यांना मानणाऱ्या गटाचा बॅण्ड्रा MET येथे, तर शरद पवार यांच्या गटाचा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मेळावा सुरु आहे. सध्याच्या घडीला आमदारांची संख्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने आहे. विधिमंडळातील जवळपास ३२ आमदार अजित पवार यांच्या सभास्थळी उपस्थित आहेत. शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या १४ आहे. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. तसेच आजच्या मेळाव्यात शरद पवार यांनी त्यांना एक गोष्ट करु नको म्हणून सांगितली होती, तीच गोष्ट त्यांनी केली. माझा फोटो वापरायचा नाही, असं शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना सांगितलं आहे. पण आज MET येथे सुरु असलेल्या मेळाव्यात एक भव्य बॅनर लावला असून त्यावर शरद पवार यांचा फोटो आहे. हीच गोष्ट अजित पवार यांना नको म्हणून शरद पवारांनी सांगितली होती.

हे ही वाचा:

Sharad Pawar ऍक्शन मोडमध्ये, उद्या दिल्लीत बोलावली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक

आजचे राशीभविष्य, ५ जुलै २०२३, तुमच्या उद्धट वागण्यामुळे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss