Friday, April 19, 2024

Latest Posts

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. नुकतंच अजित पवार यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

नुकतंच अजित पवार यांनी ट्विटर च्या माध्यमातून त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत! श्री. अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

नुकताच हा निकाल लागला आहे. आणि हा निकाल लागल्या लागल्या अवघ्या काही क्षणात अजित पवार यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. आणि मुळात अजित पवार यांनी आपल्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं देखील पद लिहिले आहे.

जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.

Latest Posts

Don't Miss