अनिल परब आणि सदानंद कदम यांना मिळाला दिलासा

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांच्यावर भाजपचे किरीट सोमैय्या यांनी हल्लाबोल केले होते, सगळ्या परीने किरीट सोमैया अनिल परब याना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते .

अनिल परब आणि सदानंद कदम यांना मिळाला दिलासा

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांच्यावर भाजपचे किरीट सोमैय्या यांनी हल्लाबोल केले होते, सगळ्या परीने किरीट सोमैया अनिल परब याना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते . मात्र आता काही अंशी अनिल परब याना दिलासा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब यांनीच ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.

दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी माझी आणि सदंड कदम यांची चौकशी केली. गेली दीड वर्षे माझी नाहक बदनामी करण्यात आली. याप्रकरणात तथ्य नसल्याचं सुरुवातीपासून मी स्वतः सांगत असताना देखील भाजपचे किरीट सोमैया माझ्या मागे लागले होते. मी प्रत्येक वीस त्यांना बोलत होतो. मी कोणतेही वाईट आणि अनधिकृत आम केले आहि तरी देखील मला मुद्दामून य प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत होते.मात्र विजय हा नेहमी सत्याचाच आणि खर्याचाच होतो हे आपल्याला देखील माहित आहे. सोमय्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करत आहेत. राष्ट्रीय हरित लवादात हे प्रकरण सुनावणीला आलं, तेव्हा या प्रकरणात काही तथ्य नाही. आम्ही हे प्रकरण बरखास्त करत आहोत, असं न्यायमूर्तींना सांगितलं. तेव्हा आपली अब्रू जाईल या भितीने किरीट सोमय्यांनी ही याचिका मागे घेतली,” असं टीकास्र अनिल परबांनी डागलं आहे.“किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल. अथवा १०० कोटींचा दावा केलाय, ते द्यावे लागतील,” असंही अनिल परब म्हणाले.“राष्ट्रीय हरिद लवादाकडे साई रिसॉर्टचे प्रकरण सुनावणीस गेले असता, त्यांनी बरखास्त केलं आहे,” असं अनिल परब यांनी सांगितलं.

किरीट सोमैया यांच्या कडून नेहमी बिन बुडाचे आरोप करण्यात येतात. तसेच आमचे आर्धे रिसॉर्ट पाडण्यात आलं आहे. राहिलेलंही पाडण्यात येणार आहे. एक जेलमध्ये आहे. दुसरा बेलवर आहे. सदानंद कदम तीन महिने झालं जेलमध्ये आहेत. तर, अनिल परब तीन जामीनावर आहेत. हिशोब तर घेणारच,” असा इशारा किरीट सोमय्यांनी डायलॉग देखील मारला होता. मात्र आता कीर्त सोमैया यांचाच शरणागती पत्करावी लागली. अनिल परब उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले तरीही खर्च केलेले साडेदहा कोटी रुपये कुठून आले, याचं उत्तर द्यावं लागणार आहे. अनिल परब आणि सदानंद कदम याना जरी निर्दोष सांगितलं असला तरी देखील त्यांच्या काडीएवढे पैसे आले कुठून असा सवाल किरीट सोमैया यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

पुण्यातल्या पोटनिवडणुकीच्या जागेवरून नाना पाटोले आणि अजित पवार आमने सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version