Friday, May 10, 2024

Latest Posts

‘मतदान नक्की करा, भारताची शान वाढवा’, ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदानाची जनजागृती

‘मतदान करा.. आणि भारताची शान वाढवा..’, मतदान हे आपल्या हातून होणारे महत्वपूर्ण कार्य असून या कार्यात आपले योगदान देवून लोकशाही बळकट करा.. असे आवाहन कासारवडवली येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजच्या तरूण पिढीला केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीप कार्यक्रमातंर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी कौतुक केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, सहाय्यक निवडणूक अधिकारी शीतल देशमुख, स्वीप नोडल अधिकारी संदीप माळवी, स्म‍िता मोहिते, सुनील यादव, १४६ ओवळा माजिवडा मतदार संघाच्या नोडल अधिकारी वर्षा दिक्षीत, तसेच सरस्वती विद्यालयाच्या संचालिका मीरा कोर्डे, ठाणे सिटिझन फोरम चे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन तसेच शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाणे शहरात विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आज सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी VOTE ची प्रतिकृती तयार करुन आजच्या तरुणांना मतदानासाठी प्रेरित केले. मतदान आपला हक्क असून प्रत्येक नागरिकांनी मतदानाच्या दिवशी थोडासा वेळ काढून मतदान करा असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला. शालेय पिढी ही उद्याचे भव‍िष्य असून त्यांनाही शालेय वयातच मतदानाचे महत्व कळावे किंबहुना आपल्या पालकांना त्यांनी मतदानासाठी प्रेर‍ित करावे अशी जनजागृती या उपक्रमातंर्गत करण्यात आली. यावेळी ‘VOTE FOR SURE’ असा संदेश देणारे फुगे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले. तसेच यावेळी सर्वांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली.

ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली मतदानाची जनजागृती ही निश्च‍ितच नागरिकांना प्रेरणादायी ठरेल व याचा उपयोग निश्च‍ितच उपयोग होईल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केला, व अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्या संचालिका मीरा कोर्डे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभ‍िनंदन केले. शालेय विद्यार्थी हे जरी मतदार नाहीत परंतु आजच्या पिढीने जर मतदान केले तर भविष्यातील पिढी तुम्ही घडवू शकता हा संदेश या जनजागृतीच्या माध्यमातून सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला असून तो अतिशय मोलाचा असल्याचे सांगत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले.

हे ही वाचा:

मतदानासंबंधित तक्रार करायचीय? मग ‘या’ पोर्टलबद्दल माहिती आहे का?

मराठी मतदारांना BJP ठरवणार कवडीमोल, उमेदवार निवडीचा काय आहे झोल?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss