Sunday, May 12, 2024

Latest Posts

महाराष्ट्र दिनी असणार मुंबई उपनगर जिल्ह्यात सायकल रॅली, पण नोंदणी कशी करायची?

‘उत्सव निवडणूकीचा, अभिमान देशाचा’ या राष्ट्रीय महोत्सवात आपण सर्वांनी २० मे २०२४ रोजी मतदान करण्यासाठी उर्त्स्फुतपणे सहभागी होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन यंत्रणेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिनी मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी कार्यालय, चेतना कॉलेज जवळ सकाळी ६.३० वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सायकल ग्रुप तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही सायकल रॅली काढण्यात येणार आहे. बीवायसीएस, मुंबई व मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.

असा असेल रॅलीचा मार्ग

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथून सायकल रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर ही रॅली मार्ग क्रमांक पहिला बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, मार्ग क्रमांक दुसरा अंधेरी क्रीडा संकुल, मार्ग क्रमांक तीसरा एनसीपीए, दक्षिण मुंबई आणि मार्ग क्रमांक चौथा मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर या चार ठिकाणी रॅली मार्गक्रमण करणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने https://torms.gle/nN9Rpi8jQY5xtspb7 गुगल फॉर्म भरायचा आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विश्वनाथ अय्यर (मोबाईल क्रमांक ९६१९४४४०२७), कमल गाडा (मोबाईल ९६२१०२५३८१) यांच्याशी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधावा, असेही सहाय्यक आयुक्त श्री. खैरनार यांनी कळविले आहे. या रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवून केली जाईल. या रॅलीमध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम, बृहन्मुंबई महानगरपालिका उपयुक्त विश्वास मोटे, प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई इत्यादी सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा:

मुस्लिम समाजासाठी नसीम खान प्रचंड आक्रमक; कॉंग्रेसमध्ये दलाल घुसल्याचा आरोप

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ! कांदा निर्यातबंदी हटवण्याचा घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss