Sunday, May 19, 2024

Latest Posts

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, नितीन देशमुखांना एसीबीकडून नोटीस

अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली असून १७ जानेवारी रोजी चौकशी साठी हजार राहण्यास संगितले आहे. ठाकरे गटाला हा धक्का लागला असून ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते एसीबीच्या निशाण्यावर आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना काही दिवसांपूर्वी एसीबीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली असून १७ जानेवारी रोजी चौकशी साठी हजार राहण्यास संगितले आहे. ठाकरे गटाला हा धक्का लागला असून ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नोटीस आल्यानंतर नितीन देशमुख नितीन देशमुख यांनी मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले,”मला १७ जानेवारी रोजी अमरावतीमध्ये मालमत्तेची माहिती देण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, १७ तारखेला मी अमरावतीमधील कार्यालयात हजर राहणार असल्याचं, नितीन देशमुख यांनी सांगितलं.

यावेळी त्यांना या प्रकरणाबद्दल विचारणा केली त्यावेळी ते म्हणाले की,”मी चौकशीसाठी हजर राहणार आहे. पण नोटीसमध्ये तक्रार देणाऱ्याचं नाव नाही. एखाद्या आमदाराला नोटीस पाठवताना कोणी तक्रार केली आहे, त्याचा उल्लेख असायला हवा. पण या नोटीसमध्ये तसा उल्लेख नाही. तक्रारकर्त्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर मला नोटीस पाठवण्यात आली आहे. तक्रारकर्त्याचं नाव समोर आल्यानंतर सत्य समोर येईल. तसेच त्याला कुणी तक्रार द्यायला लावलं, हे सुद्धा समजेल. तसेच माझ्याकडे कोणती संपत्ती अवैध आहे त्याचाही उल्लेख नाही. याबाबत १७ तारखेला अमरावतीमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल”, असं नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं.

नितीन देशमुख यांच्या आधी राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना देखील एसीबीनं नोटीस पाठवली होती. हा या प्रकरणाचा खुलासा १७ जानेवारीला नितीन देशमुख चौकशीला हजर राहिल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतील तेव्हाच होईल.

उघड चौकशी संबधाने जबाब देणेकामी उपस्थित राहण्याबाबत नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे. या नोटिसीमध्ये लिहिलं,”आपल्याविरुद्ध उघड चौकशी क्रमांक ईऔ/४६/अकोला/२०२२ अन्वये आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती परीक्षेत्रात सुरु आहे. सदर उघड चौकशीचे संबधाने आपले बयान नोंदविणे आवश्यक असल्याने बयान देणेकरिता आपण १७ जानेवारी सकाळी अकरा वाजता अपर पोलीस अधिक्षक कार्यालय लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती येथे उपस्थित राहवे. तसेच सोबत दिलेल्या मत्ता दायित्व फॉर्म क्रमांक एक ते सहाची संपूर्ण माहिती भरुन द्यावी,” अशा आशयाची नोटीस नितीन देशमुख यांना पाठवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकाच कॅसेट लावत आहेत, खडसेंच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सुनील तटकरे यांची भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा भाग झालाय, अजित पवार

मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू, उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss