Sunday, May 19, 2024

Latest Posts

आशिष शेलारांनी केली विधानसभेत मागणी

सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सव साजरा होणार आहे. या अनुषंगाने आशिष शेलार यांनी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करत एक महत्त्वाची मागणी विधानसभेत केली आहे.

सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सव साजरा होणार आहे. या अनुषंगाने आशिष शेलार यांनी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करत एक महत्त्वाची मागणी विधानसभेत केली आहे. पर्यावरणपूरक आणि शाडू मातीच्या मूर्तींचा आग्रह धरणं हे योग्यच आहे. मात्र त्याच वेळी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई महापालिकेने हिंदू सणात विघ्न आणणारे धाडसत्र थांबावावे, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. श्रावण महिना सुरु झाला आहे आणि लगबग लागली आहे ती गणेशोत्सवाची.

मुंबई महापालिकेने यावेळी गणेशोत्सवातील मूर्तींबाबत कठोर निर्बंध घातले आहेत. घरगुती गणेशमूर्तींची मर्यादा जास्तीत जास्त चार फुटापर्यंत असावी. त्या मूर्ती शाडू मातीच्याच असाव्यात याची अंमलबजावणी करताना महापालिका धाड सत्र सुरू करणार आहे. आज याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

गणपती बाप्पाची मूर्ती पर्यावरणपूरक असावी हा आग्रह धरायला हरकत नाही. म्हणून एकाकी पिओपीच्या मुर्ती बनविणाऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नये. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. तसेच मूर्तीकारांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. याबाबत निर्णय येणे बाकी असताना मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारु नये असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. या व्यवसायावर हजारो जणांचे पोट अवलंबून आहे. हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायात होते. त्यामुळे एकाकी त्यावर निर्बंध आणले तर मराठी व्यवसायिक उध्वस्त होतील. हा हिंदूचा सण आहे. धाडसत्र, मुर्ती जप्त करणे अशी विघ्न पालिकेने आणू नये, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी महिन्याभरापूर्वीच दरड दुर्घटनेचा दिला होता इशारा

कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर, मेट्रो-१२ कॉरिडॉर बांधण्यात येणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss