Tuesday, April 16, 2024

Latest Posts

आरक्षण कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंची सरकारवर टीका

मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानांतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चाना उधाण आले आहे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानांतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चाना उधाण आले आहे. जरांगे यांच्या मागणीनुसार अध्यादेश जरांगे यांच्या स्वाधिन करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात सगळीकडे गुलाल उधळला जात आहे. तर राजकीय वर्तुळामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया ट्वीट करत मांडली आहे. राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले आणि सल्ला सुद्धा दिला. राज्य सरकारने तुमच्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळण्याचे बाकी आहे. ते आरक्षण कधी मिळणार हे सुद्धा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारून घ्या, असे राज ठाकरे म्हणाले.

मनोज जरंगेंच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ रात्री उशिरा गेले. त्यानंतर जवळपास तीन तास जरांगे आणि शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे यांची भेट झाली. या भेटीवेळी मनोज जरांगे यांच्याकडे सुधारित अध्यादेश सुपूर्त करण्यात आला. या सुधारित अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या काही मागण्या देखील पूर्ण करण्यात आल्या आहेत. पण आता तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणा संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात रजित कपूर साकारणार औरंगजेबची भूमिका

बॉबी देओलचा ‘कंगुवा’ चित्रपटातील लूक आउट,वाढदिवशी प्रेक्षकांसाठी खास भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss