Saturday, March 2, 2024

Latest Posts

भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी

मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये दुसरा धमाका केला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.

भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.

भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजप आणि आरएसएसमध्ये दीर्घकाळ काम केले. राजस्थानमधील लोकसंख्येपैकी सुमारे ७ टक्के लोक ब्राह्मण आहेत.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री, तर वासुदेव देवनानी हे विधानसभेचे अध्यक्ष असतील.

कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री? (Who Is Bhajanlal Sharma)
– प्रदेश सरचिटणीस या पदावर पक्षसंघटनेत काम.
– आमदार म्हणून पहिल्यांदाच निवड .
– सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार.
– भजनलाल यांचा मतदारसंघ भाजपचा परंपरागत गड.
– तत्कालीन आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून भजनलाल यांना संधी देण्यात आली .
– भजनलाल यांना तिकीट दिलं त्याविरोधात लाहोटी समर्थकांनी भाजप मुख्यालयात आंदोलन केलं होतं.
– भजनलाल शर्मा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी.

राजस्थान पक्षीय बलाबल

भाजप – ११५
काँग्रेस – ६९
भारत आदिवासी पक्ष – ३
बसपा – २
राष्ट्रीय लोक दल – १
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी -१
अपक्ष – ———————
एकूण -१९९

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss