Saturday, July 27, 2024

Latest Posts

मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम – चंद्रशेखर बावनकुळे

कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते, मात्र आता प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल, फडणवीसांनी दिले होते, मात्र ज्याच्या कुणबी नोंदी आहेत त्यांचा निर्णय झाला आहे. ओबीसीमध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत त्याबद्दलचा निर्णय झाला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर एकमत झाले होते. ओबीसींवर अन्याय होणार नाही, ओबीसी आरक्षण टिकवणे, ओबीसी मंत्रालय निर्माण करणे हे फडणवीसांनी काम केलं आहे. ओबीसींनी घाबरू नये, अधिसूचना काढल्यावर हरकती येणार आहेत, अध्यादेश नाही. पंकजा मुंडेंची भूमिका भाजप विरोधी नाही. सरकारने अधिसूचना काढली आहे, त्यावर आक्षेप मागितले आहेत, सुनावणी होईल, अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सुनावणी होईल, त्यात आपले म्हणणे मांडता येईल. छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतली नाही, कोण काय मत व्यक्त करते, ईडब्ल्यूएसचे आरक्षण सुरू आहे. आपले मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण मुख्यमंत्री आणि भुजबळ बसतील आणि संभ्रम दूर करतील, असे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंच्या मनालायक निर्णय लागला नाही, राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो विधिमंडळाच्या नियमात जे आहे, असा निर्णय दिला आहे. नार्वेकर अत्यंत योग्य आहेत, त्यांची निवड योग्य आहे. मताच्या राजकारणासाठी लोक किती खाली जातात, याची तक्रार करू आम्ही. इम्तियाज जलील यांची तक्रार योग्य ठिकाणी करु, असे बावनकुळे म्हणाले. महायुतीचे जिल्हा मेळावे झाले, आता विभागीय मेळावे होतील. भाजप ४८ जागांवर महायुतीच्या उमेदवारांना बळ देतील. आमचे सुपर वॉरियर काम करतील, ५० हजार युनिट गाव चलो अभियान सुरू करतील. भाजपातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्री गाव चलो अभियानातून संघटनात्मक बांधणी करणार आहेत. ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत अभियान करू, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss