भाजपच्या नेत्यांनी केला मोठा दावा, उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी

पहाटेच शपथविधी हा अनेकांच्या लक्षात आहे. या शपथविधीवरून राज्यात चांगलंच राजकारण हे पेटलं होते. परंतु आता पुन्हा एकदा हा मुद्दा वादाचा विषय ठरत आहे.

भाजपच्या नेत्यांनी केला मोठा दावा, उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी

पहाटेच शपथविधी हा अनेकांच्या लक्षात आहे. या शपथविधीवरून राज्यात चांगलंच राजकारण हे पेटलं होते. परंतु आता पुन्हा एकदा हा मुद्दा वादाचा विषय ठरत आहे. २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी करण्यात आला होता. आणि या शपथविधीवरून विविध दावे केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या दोघांनी हा पहाटेचा शपथविधी झाला आहे. आता या शपथविधीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मोठा दावा केला आहे.

भाजप मधीलच नेत्यांनी पुन्हा एकदा दावा केला त्यामुळे चर्चाना पुन्हा एकदा चांगलेच उधाण आले आहे. या चर्चांमध्ये एक चन्गलच ट्विस्ट आला आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली. परंतु त्यानंतर विश्वासघात केला. यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

तसेच सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार तयार झाले. आम्हालाही उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा होता. कारण त्यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता. शिवसैनिकास सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अजित पवार सोबत आले तेव्हा कोणतीही अट टाकलेली नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते. त्यामुळेच सरकार आले, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

शरद पवार live : मोदी है तो मुमकिन है’ याला जनतेने नाकारलं आहे हे भाजपने समजून घेतले पाहिजे

कर्नाटकात काँग्रेसने आतापर्यंत मारली बाजी, आमदारांसाठी निकालापूर्वीच रिसाॅर्ट केलंय बुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version