Tuesday, April 16, 2024

Latest Posts

भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली; विनायक राऊतांनी केली भाजपवर टीका

अशोक चव्हाण यांना कंटाळून नारायण राणे (Narayan Rane) दूर गेले होते.

अशोक चव्हाण यांना कंटाळून नारायण राणे (Narayan Rane) दूर गेले होते. आता त्याच नारायण राणेंसोबत काम करावे लागणार आहे. शिंदे गटाची वाईट अवस्था होणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार आहेत. कोट्यवधी रुपये आहेत ते भाजप वासी झाले. ते धुतलेल्या तांदळाप्रमाणे आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे. मनोज जरांगेंच्या जीवाशी सरकार खेळत आहे. त्यांची विचारफूस करण्यासाठी देखील सरकार जात नाहीत. नारायण राणे मनोज जरांगेंबद्दल जे बोलले ते अयोग्य आहे, असे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले आहेत.

भाजपच्या नीतीचा प्रत्य नारायण राणेंना आला आहे. जोपर्यंत वापर आहे तो पर्यंत वापर करायचा आणि नंतर कचऱ्याचा डब्ब्यात फेकून द्याचं. भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पण दुदैव एवढंच की अशोक चव्हाण यांना राज्यसभेची जागा दिली. त्याऐवजी एका प्रामाणिक कार्यकर्त्याला ही जागा दिली असती तर ते भाजपला शोभले असते, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे. आयकर विभागाने मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला होता. याबाबत विनायक राऊत यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, जे भष्ट्राचारी आहेत त्यांनी भाजपच्या लॉन्ड्रीमध्ये जायचं, आणि स्वच्छ होवून यायचे हा राजकीय छंद बनलाय, असे विनायक राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेवर विनायक राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्ष काही वेगळा निर्णय देतील, अशी अपेक्षा नाही. शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच आज होईल. भाजपमुळे शिंदे गटाची गोची नाही ढेकूण झालं आहे, असे म्हणत भाजपवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगेच्या जीवाशी खेळण्याचे क्रूर पाप सरकार करत आहे. एकनाथ शिंदे यांना फसवलं आणि स्वतःचा टेंभा मिरवला, सरकार बेईमानी करत आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

नामदेव ढसाळ यांचा झंझावात यांचा बायोपिक झळकणार मोठ्या पडद्यावर

 एका अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगणार ‘कन्नी’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss