Tuesday, April 23, 2024

Latest Posts

भाजपची भूमिका हुकूमशाहीला पुढे नेणारी आहे, संजय राऊत

भाजपची (BJP) भूमिका हुकूमशाहीची, आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप नष्ट होईल, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut on BJP : भाजपची (BJP) भूमिका हुकूमशाहीची, आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप नष्ट होईल, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी बावनकुळेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींचा भाजप आणि त्यांची पिलावळ हे देशाचे संविधान मानायला तयार नाही, हे स्पष्ट आहे. बावनकुळे जे म्हणत आहेत ते लोकशाही त्यांनी आणलेली आहे का? काही वर्षांपूर्वी हेच जे. पी. नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी सुद्धा अशाच प्रकारच वक्तव्य केले होत. भाजप आज त्याच जे. पी. नड्डा आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकीसाठी दुसरे पक्ष फोडावे लागत आहेत. तुम्ही कितीही म्हणालात की, याला त्याला संपवू पण ते शक्य होणार नाही. या देशात लोकशाही आहे. २०२४ नंतर तुमचा पक्ष काँग्रेसमय झालेला असेल. आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपून जाईल. सगळ्या आमदार, खासदारांनी जर ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपून जाईल . तुमची भूमिका हुकूमशाहीला पुढे नेणारी आहे. भाजपाला लोकशाही देशातली नष्ट करायची आहे, स्वतंत्र्य नष्ट करायचे आहे. मोदी शहांची विचारसरणी आहे. २०२४ मध्ये मैदानात कोण राहतं आणि कोण कोणाला संपवत? हे कळेल.

याच वेळी बोलत असताना संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आमचं तुमच्या वडिलांसारखे शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरत नाही. ज्यांना उद्धव ठाकरेंनी लायकी नसताना उमेदवारी दिली, तेच आम्हाला बोलत आहेत. पक्षाने जबाबदारी दिली नव्हती, तुम्ही बेरोजगार होता, तुमच्याकडे काही काम नव्हतं, तुमच्याकडे फक्त डिग्री होती, तुमचे वडील आले गोपाळ लांडगे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. पण तुमच्या वडिलांनी सांगितलं की, माझा मुलगा आहे. हा मोकळा आहे, त्याला मी कल्याण मधून निवडून आणेल. कुठल्याही पक्षात असे निर्णय घेतले जात नाहीत. परंतु माणुसकीच्या नात्याने उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. तुम्ही शिवसेनेत येऊन काय केलं?

तर पुढे राऊत म्हणाले आहेत की, प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. महाविकास आघाडीचा घटक करून घ्या, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेतली, त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकांमधून ते सामील होतात. या देशात संविधान वाचविण्याची आघाडी सुरू आहे. उत्तर प्रदेश मध्ये मायावतींचे सरकार वेगळ आहे, त्यांना अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत करायची आहे. मला असं वाटतं आंबेडकर त्यांच्या बाजूने जाणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे. त्यांच्या काही भूमिका जाहीरपणे ते मांडत असतील, तो त्यांचा वेगळा प्रश्न आहे. २७ तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीला आम्ही वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी येण्याच मान्य केले आहे. जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल. त्यांना अपेक्षित असलेलं जागावाटप जगाच्या राजकारणात कुठेही होत नाही. त्यांना कुठल्या जागा हव्यात? ते त्यांना द्यायला आम्ही तयार आहोत. ते त्यांना माहित आहे पण त्यांच्याकडून एखादी भूमिका येत असेल तर त्यावर चर्चा करू, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील एक घटक आहे.

Latest Posts

Don't Miss