Saturday, July 27, 2024

Latest Posts

ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठीचा अर्थसंकल्प, जयंत पाटलांचा हल्लाबोल

राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला आजचा अर्थसंकल्प हा केवळ ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठी या अंतरिम बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला आजचा अर्थसंकल्प हा केवळ ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठी या अंतरिम बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील म्हणाले की, खरं म्हणजे अंतरिम अर्थसंकल्पात अशा घोषणा करायच्या नसतात. अंतरिम बजेट हे वेगळं असतं आणि नॉर्मल बजेट वेगळं असतं. नॉर्मल बजेटच्यापेक्षा पुढं जाऊन आज बजेट मांडण्याचा खटाटोप झालेला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात त्यांची ढासळती जी लोकप्रियता आहे. ती सावरण्यासाठी मांडलेल आहे. त्यापेक्षा या बजेटमध्ये विशेष काही नाही असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, सरकारने आहे तीच परिस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. अंतरिम अर्थसंकल्प हा पुढच्या चार महिन्यासाठी व्होट आणि अकाऊंटसाठी असते. पण राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री यांनी दिलेले सगळे पायंडे मोडून आज अंतरिम अर्थसंकल्पाच्या नावाखाली पूर्ण बजेट मांडला. नऊ हजार कोटी रुपयाचे अर्थसंकल्पाची घोषणा केली. मागच्या वर्षी १७ हजार कोटीचा बजेट आणि त्यानंतर सादर केलेल्या पुरवणी मागण्या मिळून एक लाख कोटी वजा या सरकारकडे होते. आता त्यानंतर नवीन बजेट मांडताना फक्त नऊ हजार कोटी रुपयाचं महसुली तुटीचं बजेट मांडलं. याचा अर्थ एक लाख कोटी रुपयांच्या केलेल्या ज्या घोषणा आहेत, वेगवेगळी कामं आहेत. त्याचं काय झालं याचा खुलासा होणं आवश्यक आहे असेही जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील म्हणाले की, आज सभागृहामध्ये ज्या घोषणा करण्यात आल्या बजेटच्या माध्यमातून त्या हजारो कोटी रुपयाच्या आहेत. आज ८ लाख कोटी रुपयाची राज्यात कामं सुरू आहेत असं सांगण्यात आलं. हे जे गुढीगुढी तयार करण्याचं, गुलाबी पिक्चर तयार करण्याचं काम आहे. त्यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा मर्यादित आहे. राज्य सरकारकडे पाच लाख कोटी, सतरा टक्के रक्कम ही जवळपास म्हणजे पुरवणी मागण्याच्या मार्फत त्यांनी मागच्या वर्षभरात मांडलेली होती. आणि त्यामुळं पुरवणी मागण्या एक लाख कोटी रुपयाच्या राज्य सरकारने ३१ मार्चच्या आधीच्या या वर्षात आधीच मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळे राज्य सरकारचा आर्थिक पूर्णपणाने धोरण नियोजन नाही. त्यामुळे राज्य सरकारचा आर्थिक पूर्णपणाने धोरण नियोजन कोणतंही नाही असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, वेगवेगळ्या भावनात्मक, लोकांच्या भावना ज्या गुंतलेल्या आहेत त्याचा उल्लेख करायचा आणि त्याविषयी घोषणा करून काही रकमा घोषित करायच्या, यात पूर्णपणाने राज्य सरकारने अर्थ अर्थसंकल्पाचे कोणतेही विधी निषेध न बाळगता हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. राज्य सरकारने फक्त निवडणुकीच्याकडे बघून हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी आम्ही देणार आहोत अशा मांडलेलं आहे असेही जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले आहे.

हे ही वाचा:

फक्त आजच नाही तर ३६५ दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा – Raj Thackeray

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss