Tuesday, May 21, 2024

Latest Posts

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे – देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) सध्या अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर आहेत आणि तेथे त्यांची पत्रकार परिषद पार पडली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) सध्या अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर आहेत आणि तेथे त्यांची पत्रकार परिषद पार पडली. आज देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्यामध्ये नगर शहरातील शेती आणि विकासकामांचा आढावा बैठक घेण्यासाठी आले आहेत. त्यामध्ये ते म्हणाले की, जलयुक्त शिवार ही एक अत्यंत यशस्वी योजना होती या योजनेचा मी आढावा घेतला.

त्यामध्ये एकूण दहाशे पस्तीस गावांमध्ये ३२,००० कामे झाली आहेत आणि या गावांवर ६५१ कोटी रुपये यावर खर्च झाले आहेत. जवळपास २लाख ९८ हजार हेक्टर एवढं सिंचन हे नगर जिल्यामध्ये जिलयुक्त शिवार योजनेमुळे तयार झाले आहेत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना पुढे सात ते आठ दिवसांमध्ये अनुदान दिले जाईल. मुंबईमधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहेत.

बँक खात्यांच्या पडताळणीस वेळ लागत आहे. नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. तुम्हाला काम पाहिजे म्हणून ते बोलतात. आम्हाला खूप काम आहेत त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये एकसमवेत संपूर्ण काम होईल सर्व निर्णय झाले की तुम्हाला सांगितले जातील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. संजय राऊतांवर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोण राऊत?

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss