Saturday, July 27, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंवर घणाघात, मागण्या सतत बदलत गेल्या…

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापल्याचे चित्र दिसून येत आहेत. अश्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापल्याचे चित्र दिसून येत आहेत. अश्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी दोन वेळा एवढ्या संख्येने आलेल्या मराठा समाजाला सामोरे गेलो. मला मनोज जरांगे यांच्याशी काही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली. असं कुठं चालतं का? एकेरी पद्धतीने बोलणं हे शोभतं का? मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची भाषा नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे. जाती-जातीत भांडण करण्याचा प्रयत्न आहे, हे लक्षात आलं आहे. जी अधिसूचना काढण्यात आली, त्यावर साडे सहा लाख हरकती आल्या आहेत, असं मुख्यमंत्री शिंदेनी सांगितलं. मनोज जरांगे यांची भाषा कुणाची आहे, यावर बोलणार नाही. कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, कायदा सर्वांना पाळावा लागेल. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात येऊं देणार नाही, असं ते म्हणाले. तुमच्या गाड्यांवर हल्ला झाला तर, सरकार तुमच्या पाठीशी उभा राहील. नारायण राणे यांना ताटावरुन उचललं. एवढं काय मोठा गुन्हा होता. नवनीत राणाला हनुमान चालिसा वाचायची होती तर, १२ दिवस जेलमध्ये टाकलं, कंगना राणावतचं घर तोडलं, असं म्हणत शिंदेंनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

 

मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, मात्र त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. मी जे बोलतो ते करून दाखवतो. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल अशी भूमिका मी घेतली. आम्ही जोपर्यंत सत्तेत होतो, तोपर्यंत आरक्षण कोर्टात टिकलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही. मनोज जरांगे यांनी सरसकट प्रमाणपत्र देता येणारं नाही, हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. सगेसोयरेचा मुद्दा त्यानंतर आला. त्यांच्या सातत्यानं मागण्या बदलत गेल्या, त्यानंतर ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. कुणी दगड जमा केले, कुणी दगड मारले ह्याचा अहवाल पोलिसांकडे आहे. आता सरकार कुणावरही अन्याय करणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

हे ही वाचा:

फक्त आजच नाही तर ३६५ दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा – Raj Thackeray

मुंबईत आज पाणीपुरवठा बंद; काही भागात १०० टक्के तर ३० टक्के पाणीपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss