Sunday, May 19, 2024

Latest Posts

‘जोडे पुसणारे…’, उद्धव ठाकरेंच्या या टिकेला मुख्यमंत्री शिंदेंच प्रत्युत्तर

Eknath shinde on uddhav thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या ६८ वर्षांच्या इतिहासात कधी झाला नव्हता असा बंड उभ्या महाराष्ट्राने व देशाने पाहिला.

Eknath shinde on uddhav thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या ६८ वर्षांच्या इतिहासात कधी झाला नव्हता असा बंड उभ्या महाराष्ट्राने व देशाने पाहिला. या संघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांचा व उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक राहिलेलेल्या खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा एकमेकांप्रती असणारा राग हा वेळोवेळी समोर आला. एकीकडे या बंडाला उठाव म्हटलं गेलं तर दुसरीकडे गद्दारीचा आमदारांच्या पाठीशी लागला. या दहा महिन्याच्या काळात कधीकाळी एका ताटात खाणारे सहकारी आज एकमेकांच्या सावलीलाही उभे राहत नाहीयेत. अशातच काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावती जहरी टीका केली आहे. “जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं काय होणार? मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही शक्य होतं ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारच”, अशा तिखट शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचा व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिला आहे. “केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे . जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

हे ही वाचा : 

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ, काय आहेत अपघाताची नेमकी कारणं?

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss