Monday, April 22, 2024

Latest Posts

CM Eknath Shinde आणि Narayan Rane यांची बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण  आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणूकीमध्ये उमेदवारीतून काढता पाय घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची टिप्पणी केली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही, उमेदवारी संदर्भातील सर्व निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर घेतील, असे नारायण राणे रत्नागिरीमध्ये म्हणाले होते. त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेच्या उमेदवारीमधून पत्ता कट झाल्यानंतर नाराज झाले नाहीत का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील की नाही, याबाबत आता चर्चा रंगताना दिसून येत आहेत.

हे ही वाचा:

 भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss